'पैशाचं झाड' हा अभ्यासक्रम प्रत्येकाच्या आयुष्यात खूप गरजेचा आहे, पण शाळेत किंवा महाविद्यालयात तो शिकवला जात नाही! म्हणून e4 team (पोस्ट कॉर्नर +)™ या व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपच्या माध्यमातून तुमच्यासाठी 'पैशाचं झाड' या अभ्यासक्रमात पैसा, आर्थिक साक्षरता, व्यवसाय, उद्योग, व्यवहार इ. विषयांवर लेखांची शृंखला सुरू केली आहे!
प्रत्येकाने याचे धडे गिरवायला हवेत!
तुम्ही, तुमच्या घरातील आई-वडील, भाऊ-बहिण, मुलं-मुली, मित्र, नातेवाईक सर्वांनीच हे लेख वाचावेत, त्यावर विचार, मंथन करून चर्चा करावी. तेव्हा आपण अर्थ साक्षर व्हायला लागू!
The Money Tree : (अभ्यासक्रम - भाग 1)
(रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकातील शेरॉन लेश्टर यांचे मनोगत - मराठी अनुवाद)
आधी थोडंसं.... गरज आहे!
खऱ्या जगात स्वतंत्रपणे उभं राहता यावं, याची तयारी शाळा करून घेतात का? त्या मुलांची चांगली तयारी करून घेतात का? खूप अभ्यास करा, चांगले गुण मिळवा म्हणजे तुम्हाला चांगला पगार आणि फायदे देणारी नोकरी मिळेल, असं माझे आई-वडील नेहमी सांगत असत. मी आणि माझ्या मोठ्या बहिणीने जीवनात यशस्वी व्हावे यासाठी आम्हाला उत्तमातील उत्तम शिक्षण द्यायला हवं, हेच त्यांच्या पुढचे ध्येय होतं!
1976 मध्ये मी डिग्री घेतली. त्यानंतर फ्लोरिडा स्टेट विद्यापीठाची पदवी मिळवली. पदवी परीक्षेत अकाउंटिंग विषयात मला सर्वाधिक गुण मिळाले होते. त्यावेळी त्याची ध्येयपूर्ती झाली. त्यांच्या जीवनातला तो यशाचा मुकुटमणी होता. आमच्या मास्टर प्लान प्रमाणे मला त्या काळातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या अकाउंटिंग कंपन्यांपैकी एकीनं नोकरी देऊ केली. आता मला यशस्वी कारकिर्दीचे वेध लागले होते. भरपूर पैसा कमवून वेळे आधीच निवृत्ती घेण्याची मी स्वप्न पाहू लागले होते.
माझे पती मायकेल हे देखील याच मार्गाने गेले. आम्हा दोघांचे कुटुंब अतिशय कष्टाळू आणि कामसू होती. उत्पन्न मर्यादित असले तरी काम हाच आमचा मंत्र होता. मायकेल द्वीपदवीधर झाले. त्यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवली. त्यानंतर पेटंटच्या कायद्यात विशेषज्ञ मानल्या जाणाऱ्या वॉशिंग्टन मधील एका विख्यात कंपनीनं त्यांना बोलावून घेतलं. आता त्यांचेही भवितव्य उज्वल होतं. उत्तम कारकीर्द आणि वेळेआधी निवृत्ती!
आम्हा दोघांचीही कारकीर्द उत्तम सुरू झाली होती. आम्ही त्या दृष्टीने यशस्वी असलो तरी अपेक्षेनुसार काही घडताना दिसत नव्हतं. निवृत्तीनंतरची आर्थिक तजवीज करण्यासाठी आम्ही अनेकदा नोकर्या बदलल्या. वरचे हुद्दे मिळवत गेलो. तरीही आमच्या संचयात जी काही भर पडत होती ती आमच्याच पैशांची होती.
आमचं वैवाहिक जीवन अगदी सुखी आणि समाधानी आहे. आमची तिन्ही मुलं अगदी सद्गुणी. दोघेजण माध्यमिक विद्यालयात आहेत, तर एक शाळेत जायला लागले. आपल्या मुलांना उत्तमातले उत्तम शिक्षण मिळावे यासाठी आमची धडपड सुरू असते. त्यासाठी आम्ही खूप खर्चही करतो. 1996 साल होतं ते! एके दिवशी माझा मुलगा शाळेतून अगदी निराश होऊन घरी परतला. त्याला सारं काही नीरस वाटत होतं. अभ्यासाचा तर प्रचंड कंटाळा आला होता. 'हे माझ्या आयुष्यात कधीही उपयोगी पडणार नाही, त्या अभ्यासात मी वेळ घालवला', असा त्याचा साधा प्रश्न होता. मी चटकन उत्तर दिलं, 'तू जर शाळेत चांगला अभ्यास केला नाहीस, चांगले गुण मिळवले नाहीस तर तुला महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही.'
'मी महाविद्यालयात जाईन किंवा जाणारही नाही श्रीमंत मात्र नक्कीच होईल!' त्याने हे उत्तर दिलं.
तू जर पदवीधर झाला नाहीस, तर तुला चांगली नोकरीही मिळणार नाही आणि तुला नोकरी मिळाली नाही, तर तू श्रीमंत कसा होशील? माझ्या प्रश्नात 'आईच्या' काळजीची छटा होती.
माझा प्रश्न ऐकून तो थोडासा हसला. त्यानं कंटाळल्यावानी मान हलवली. थोडा वेळ खाली पाहत राहिला. आमचं अनेकदा हेच संभाषण या आधी झालं आहे. पुन्हा एकदा 'माझा' आईचा सल्ला ऐकताना त्याने कान बंद करून ठेवले होते. त्याची इच्छाशक्ती तेवढीच जबरदस्त आहे आणि हे सारं असूनही तो विनयशील आणि इतरांचा मान राखणारा आहे.
माझं बोलणं झाल्यावर त्याने मान वर केली आणि म्हणाला, "आई ही मला मिळणाऱ्या व्याख्यानांची नांदी होती. आई, काळाबरोबर चालायला शिक! जरा आजूबाजूला पहा! ही श्रीमंत मंडळी त्यांनी घेतलेल्या शिक्षणामुळे श्रीमंत नसतात. मायकल जॉर्डन आणि मॅडोनाकडे पहा. हावर्ड विद्यापीठातील शिक्षण अर्धवटच ठेवलेल्या बिल गेट्स उदाहरण घे. त्यांनीच मायक्रोसोफ्टची स्थापना केली आणि तिशीत असतानाच ते अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. बेसबॉलच्या खेळाडूवर तर मानसिकरीत्या अपरिपक्व असल्याचा शिक्का आहे, तरीही तो वर्षाला 40 लाख डॉलर्स कमावतो.
त्याचं बोलणं संपलं आणि शांतता पसरली. मला माझे आई-वडील जो सल्ला देत होते तेच मी माझ्या मुलांना सांगत होते. आजूबाजूचे जग कितीही बदललं तरी सल्ला कायमच राहिला होता.
उत्तम शिक्षण घेतलं आणि गुण मिळवल्यानंतर तुम्ही यशस्वी होताच असं नाही. हे माझ्यापेक्षा माझ्या मुलांच्याच जास्त लवकर लक्षात आलं होतं.
आई! तो पुढे बोलू लागला. मी काही तू आणि डॅडींएवढे कष्ट करणार नाही. तू खूप पैसे मिळवतेस. आपण खूप मोठ्या घरात राहतो. माझ्याकडे खूप खेळणी आहेत, हेही खरं आहे. पण मी जर तुझा सल्ला ऐकला तर माझ्यावरही तुझ्यासारखीच वेळ येईल. कमवण्यासाठी खूप कष्ट करायचे आणि शेवटी कर्ज फेडत बसायचं. आतातर नोकरीची शाश्वती नसते. कंपन्यांमध्ये नोकर कपात असते. त्याला 'डाऊन साइझिंग' किंवा 'राईट साइझिंग' अशी नावं असतात, हेही मला माहीत आहे. तू पदवीधर झालीस आणि नोकरी करू लागलीस तेव्हा तुला मिळणार्या पगारायेवढा पगारही आज नव्या लोकांना मिळत नाही. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांकडे त्यांना आता पूर्वीसारखे उत्पन्न मिळत नाही. मलाही माहीत आहे की मी निवृत्तीनंतर सामाजिक सुरक्षितता योजना किंवा निवृत्तीवेतनावर अवलंबून राहू शकणार नाही. मला काही नव्या प्रश्नांची नव्यानं उत्तर हवी आहेत.
त्याच बरोबर होतं. आता मलाही काही नव्या प्रश्नांची नवी उत्तरे शोधायची होती. माझ्या आई-वडिलांनी दिलेला सल्ला 1945 पूर्वी जन्मलेल्यांसाठी उपयुक्त असेलही कदाचित, पण वेगानं बदलणाऱ्या जगात जन्मलेल्यांसाठी तो अनर्थकारक ठरू शकतो. आता मी माझ्या मुलांना 'शाळेत जा, भरपूर शिका आणि सुरक्षित नोकरी मिळवा' असं सांगू शकत नाही.
आता मुलांच्या शिक्षणाचाही नव्याने विचार करायला हवा, हेही मला जाणवलं.
शालेय अभ्यासक्रमामध्ये आर्थिक विषय कधीच नसतात याची मला एक आई आणि अकाउंटंट म्हणून काळजी वाटू लागली. आज शालेय शिक्षण पूर्ण करण्याआधीच मुलांकडे क्रेडिट कार्ड आलेली असतात; पण त्यांना आर्थिक विषयाची काहीच जाण नसते. पैसे कसे गुंतवावेत किंवा ते वापरत असलेल्या क्रेडिट कार्डवरची व्याज आकारणी कशी होते, हे त्यांना माहीत नसतं. सोप्या शब्दात आर्थिक साक्षरता आणि पैशांबाबत ज्ञान असल्याशिवाय ते या बदलत्या जगाला तोंड देऊ शकणार नाहीत. आजच्या जगात तर बचती पेक्षा खर्चाला जास्त महत्त्व दिलं जातं. अशा वेळी हे ज्ञान आवश्यकच ठरते.
माझा थोरला मुलगा महाविद्यालयात जाऊ लागल्यानंतर क्रेडिट कार्डच्या विळख्यात अडकला होता. त्या कर्जात तो आकंठ बुडाला होता. मी त्याला त्यातून बाहेर पडून ती सारी क्रेडिट कार्ड नष्ट करण्यासाठी मदत केली आणि माझ्या मुलांना अर्थ विषयक प्रशिक्षण देऊ शकेल अशा अभ्यासक्रमाचा शोध सुरू केला.
एक दिवशी माझ्या पतीने मला कार्यालयातून फोन केला. ते म्हणाले, 'माझ्यासमोर रॉबर्ट कियोसाकी नावाचे एक गृहस्थ बसलेले आहेत. ते व्यावसायिक आणि गुंतवणूकदार आहेत. माझ्याकडे ते एका अभ्यासक्रमाचे पेटंट घेण्यासाठी आले आहेत. मला वाटतं तू ज्याच्या शोधात होतीस, ते सापडलं आहे. तू त्यांना भेट.'
शाळे मध्ये आर्थिक आणि व्यावसायीक ज्ञान दिले तर बेरोजगारांची संख्या कमी होईल.
ReplyDeleteबरोबर आहे सर
ReplyDeleteSir kontya book mdhun getle aahe
ReplyDeleteRich dad poor dad
ReplyDelete