जीवनाच्या वाटेवर चालताना.....
जेव्हा सर्व संपून गेलं असं वाटतं तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची.
आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, तळतळाट मात्र कोणाचाही करून घेऊ नका. आपल्या सुखा करता कोणालाही दुखवू नका.
नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही. नशीब आपोआप निर्माण होत नाही, तर केवळ माणूसच प्रत्यक्षात स्वतःचे नशीब स्वतः घडवत असतो. नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे.
एखाद्याला सोडून जाताना मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये. जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकट राहण्यापेक्षा जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून राहा. कुणालाही मदत करत असताना त्यांच्या डोळ्यात बघू नका कारण त्याचे झुकलेले डोळे तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतात.
कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.
अगदी सरळ मार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे, हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण ठरते.
सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडु वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो. त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच.
शब्दांमुळेच जुळतात मनाच्या तारा आणि शब्दांमुळेच चडतो एखाद्याचा पारा. शब्द जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी. म्हणूनच जो मन जिंकेल तो जग जिंकेल.
स्पष्ट बोला पण असे बोला की समोरच्याला कष्ट होणार नाही आणि त्याचे आणि तुमचे नाते नष्ट होणार नाही. प्रयत्न करा की कोणी आपल्यावर रुसू नये, जीवलगाची सोबत कधी तुटू नये. नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे, निभवा अशे की त्याचे बंध कधीच तुटू नये.
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले बना आणि मग बघा कुणीतरी चांगले माणसं तुम्हाला शोधत येईल. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते केव्हा आणि कसं वापरायचं याचे ज्ञानही असावे.
एक लक्षात ठेवा जे जे तुम्हाला हवे असते ते ते तुम्हाला वेळ आल्यावर मिळते. त्यामुळे या क्षणी काही मिळाले नाही तर निराश होऊ नका.
एकच व्यक्ती जर तुम्हाला एकच धडा दोन वेळा शिकवत असेल तर चुकी त्यांची नाही, तुमची आहे.
एवढे लहान बना की प्रत्येक जण तुमच्यासोबत बसेल आणि इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल.
आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजायचं, आपला उत्कर्ष होतो.
अपयश, अडचणी, अडथळे, कठीण परिस्थिती काय करू शकतात? तुमची शक्ती काढून घेऊ शकतात किंवा तुम्हाला शक्ती देऊ शकतात. मग ठरवायचं तुम्हाला की तुम्हाला कोणाची निवड करायची!
जर लोकांना तुमच्याशी प्रॉब्लेम असेल, तर कायम ध्यानात ठेवा. तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, तुमचा नाही!
आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींपासून आनंद घ्यायला शिका. कारण एखाद्या दिवशी असं वाटू लागेल की 'अरे खरंच, तेव्हा राहून गेलं त्या खूप मोठ्या गोष्टी होत्या!'
आयुष्यात मनस्ताप टाळायचा असेल तर कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नका. जे लोक तुम्हाला पाठीमागे बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते तुमच्या पाठीमागे होते, पाठीमागेच राहणार आणि तुम्हाला फेमस करणार, त्यांची लायकीच ती आहे!
प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्याजवळ आहे तोच खरा श्रीमंत!
चांगले दिवस येतील म्हणून वाट पाहू नका, उठा आणि स्वतःच्या हिमतीने चांगले आयुष्य खेचून आणा.
Khupch sundar vichar aahet
ReplyDeleteThank you so much sir
Deleteही अगदी बरोबर आसं , वागलं तर यश आपोआप येईल
ReplyDeleteHoy sir, nakkich
Delete