हो हे शक्य आहे. आणि खरं म्हणजे तुमच्याच हातात आहे. हे वाक्य वाचून जरा अश्चर्य वाटलं ना?
दिवस माझा, सकाळ माझी, झोप माझी, मन माझं, विचार, जबाबदारी माझी, अपेक्षा माझ्या, मला वाटतं माझ्या मनासारखं व्हाव.
मग मला माझी कर्तव्य अपेक्षापूर्ती होण्यासाठी राबवावी लागतील. म्हणजे मला माझा उद्या (भविष्यकाळ) चांगला व्हावा यासाठी प्लॕनिंग करावं लागेल. जर मी काही प्लॕन करत असेल तरच त्या प्रमाणे घडवून आणण्यासाठी प्रयत्न करीन व तसे घडवीन. म्हणजे प्लॕनिंग साठी लागेल टार्गेट ते तर तुमच्याकडे आहे.
"माझा दिवस चांगला जावा" टार्गेट छोटं किंवा मोठं असं काही नसतं. टार्गेट पाहीजे एवढच महत्वाचं असतं. हे झालं आता तुम्हाला तुमचा जो दिवस चांगला जावा असे वाटते. त्याच्या आधी काही काळ तो दिवस कसा असला पाहीजे याचा व्यवस्थित प्लॕन करा ते लिहून काढा. त्याप्रमाणे कामे करत रहा. त्यात काही अडथळे आले थोडे फ्लेक्झिबल व्हा. तुमच्यात elasticity म्हणजे लवचिकता ही natural power आहे. ती वापरा. तुमच्यात सहन शक्ती आहे ती वापरा. तुमच्यात ॲडजस्टमेंट करण्याची पॉवर आहे ती वापरा.
कारण तुमचा उद्या चांगला झाला पाहीजे ही तुमची गरज आहे. दुसऱ्यांची नाही. तरीही नाही जमले. तर प्लॕनमधे थोडाफार बदल करा. आणि पूढे जा कारण बदल स्विकारणे ही सुद्धा एक नॕचरल पॉवर आहे. निसर्गाने सर्वांसाठी सर्वकाही निर्माण केलय व ते मिळवण्यासाठी जी आयुधं लागतात ती दिलेली आहेत. बघा वेळ ही एक अशीच पॉवरफुल शक्ती फुकट उपलब्ध आहे. सर्वांसाठी सारखीच आहे. तिचा वापर करण्यासाठी बुद्धी दिलीय.
ही सुद्धा अनलीमिटेड दिलीय. जो वेळेवर वेळेप्रमाणे वेळेचा वापर करतो त्याचा उद्या चांगला होतो. वेळेचा योग्य वापर किंवा नियोजन म्हणजे प्लॕनिंग. स्वतःला एवढे बीझी करा एवढे बीझी करा की दिवस कसा गेला हा विचार करायला वेळच मिळू नये. म्हणजे दिवस चांगला होता असं ख-या अर्थाने म्हणता येईल. काय आलं ना लक्षात.?
जाणून घ्या!
सायली सावंत, पर्सनल कोच (समुपदेशक), e4 Team
संवाद साधा - 7822887227
W app करा - 9975359911
---------------------------------------
(e4 पोस्ट कॉर्नर +)™
इथे उद्योग, व्यवसाय, करीअर तसेच व्यक्तिमत्व म्हणजे काय, व्यक्तिमत्वाचा विकास कसा करावा आणि प्रभावी व्यक्तिमत्व घडवण्यासाठी नक्की काय करावे..
इ. विषयांवर लेख वाचायला मिळतात.
स्वतःला स्वावलंबी बनवण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय वाढविण्यासाठी आणि स्वतःचा रोजगार स्वतःच निर्माण करण्यासाठी (e4 पोस्ट कॉर्नर +)™ महत्त्वाचे बोलू काही या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपच्या माध्यमातून प्रत्येकाला
Encourage | Educate | Empower | Employ
करणे हा आमचा उद्देश आहे.
Big ossome thoughts....
ReplyDeleteNice post
ReplyDeleteVery nice sir
ReplyDeleteSuper
ReplyDeleteGood
Yes sir/madam
ReplyDeleteYes sir/madam
ReplyDelete