Skip to main content

तरुणपणात व्यवसाय सुरू करण्याचे फायदे

तरुणपणी व्यवसाय सुरु करण्याचे खूप फायदे आहेत आणि बऱ्यापैकी तोटे पण आहेत. आपण फायदे बघू:

  1. आपण तरुण असतो, म्हणजे आई वडिलांची, बायकोची, मुलांची जबाबदारी नसते (सर्वसाधारणपणे २० ते २८ चा वयोगट). नंतरच्या काळात प्रपंचाची जबाबदारी आपल्यावर असते आणि आपण हवा तसा आर्थिक धोका पत्करू शकत नाही. २८ च्या वयात जवळचे सगळे पैसे संपले तरी बरीच उमेद आणि आयुष्य बाकी असतं, पुढच्या ३-४ वर्षात मेहनत करून गेलेलं सगळं परत मिळवता येतं. ३५-४० च्या पुढच्या वयोगटात गेल्यावर घरची जबाबदारी असते, मुलांची जबाबदारी असते. त्यावेळी सगळी पुंजी (सेव्हिन्ग) घालवून बसणं कधीही धोक्याचं असतं.
  2. तरुणपणात (विशीत) चुका केल्या तरी व्यवसायातली लोक नवीन माणूस म्हणून कधी कधी समजून घेतात आणि समजून सांगतात. त्यातूनच आपल्याला व्यवसायातले गुरु भेटत जातात. पण वय जास्त असलं की लोक आपोआप आपल्याकडून एका प्रगल्भतेची अपेक्षा करतात, जी कदाचित आपल्याकडे असेलच ह्याची खात्री नसते.
  3. वेळ ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही पार्टी, चित्रपट, फिरणे कमी करू शकता पण प्रपंच मागे लागल्यावर काही गोष्टी झटकून टाकता येत नाहीत.

Comments

Post a Comment