Skip to main content

100% यशाची पहिली पायरी कोणती?


१००% यश मिळवण्याची पहीली पायरी म्हणजे

वाचन

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक, बिल गेट्स यांनी दिलेल्या मुलाखतीतील मराठी अनुवाद


वाचन

म्हणलं की बहुतेक जणांना कंटाळवाणी गोष्ट वाटते, परंतु हे साफ चुकीचे आहे.

वाचन खूप महत्त्वाचे आहे आणि आताच्या जलद गतीने बदलणाऱ्या जगात वाचनाला पर्याय राहिलेला नाहीच. हे वास्तव आहे की

Updated

व्हा

नाहीतर

Outdated

व्हाल!

ज्याने आपले ज्ञान वेळेनुसार वाढवले नाही तर तो मागे राहणारच, यात काही शंका नाही.

म्हणून

वाचाल तर वाचाल

ही म्हण प्रचलित आहे ना...

पण

“वाचाल तर वाचाल” याचा खरा अर्थ समजायचा असेल तर आपणास पहिल्यांदा काही गैरसमज दूर करावे लागतील. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्व साधारण लोक समजतात की वाचन हे शाळा, महाविद्यालयापर्यंत मर्यादित आहे. हे समजण्यासाठी आपल्याला दोन इंग्रजी शब्द समजून घ्यावे लागतील,

एडुकेशन (Education)

आणि

लर्निंग (Learning)

तसे दोन्ही शब्द आलटून पालटून वापरले जातात, पण यांत खूप मोठा फरक आहे. एडुकेशन म्हणजे शाळेत, महाविद्यालयात जी एक औपचारिक शिक्षण प्रक्रिया असते, जी एका ठराविक वेळे नंतर थांबते ती. एडुकेशन हे दुसऱ्यांकडून मिळते, म्हणजे शिक्षक, गुरु आदी. त्याच्या परे लर्निंग जन्मापासून मृत्यू पर्यंत चालू राहते. ही अनौपचारिक शिक्षण प्रक्रिया आहे, यात परीक्षा नसते, गुण नसतात. मनुष्य आयुष्यभर शिकतच असतो. एडुकेशन महत्वाचे आहेत, पण लर्निंग खूप महत्वाचे आहे. आणि दोन्ही मध्ये प्रगती करण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही. एडुकेशन आपणास गणित, विज्ञान, समाजशाश्त्र आदी शिकवते, नोकरी मिळवण्यास मदत करते. पण लर्निंग आयुष्य जगायला शिकवते, आनंदी राहायला शिकवते. नोकरी आयुष्यात महत्वाचा भाग आहे पण नोकरी पलीकडे पण खूप काही शिकावे लागते.

चार लोकांसमोर आत्मविश्वासाने कसे बोलावे, इंटरनेट वापरने, बिल भरणे, जागा, घर नावावर करणे, योगा, डाएट, बँक, कर व्यवहार अश्या हजार गोष्टी शिकाव्या लागतात. आणि या शाळेत शिकवल्या जात नाहीत, त्यासाठी वाचन करावेच लागते. किंवा कोणी तज्ज्ञ व्यक्तीकडून ते अर्जित करावे लागते. पण असे तज्ज्ञ दरवेळी मिळतीलच असे नाही, त्यामुळे वाचन हे करावे लागतेच.

आत्ताच्या तांत्रिक प्रगतीमुळे “वाचाल वर वाचाल” या म्हणीचा अर्थच बदलला आहे. जेव्हा ही म्हण प्रचलित झाली तेव्हा माहिती किंवा ज्ञान वाटपाचे नेमकेच प्रकार होते. मुख्य म्हणजे शाब्दिक प्रकार, पुस्तक, कादंबरी आदी च्या रूपात.

आजच्या डिजिटल क्रांतीने ज्ञान वाटपाचे नव-नवीन प्रकार सादर केले आहेत. आज ज्ञान हे इमेजेस, विडिओ, इन्फोग्राफिक्स, चार्ट्स, ऍनिमेशन, सिम्युलेशन, वर्चुअल रिऍलिटी च्या माध्यमात प्रसारित केले जाते.



त्यामुळे वाचन म्हणजेच ज्ञानार्जन खूप सोपे झाले आहे, आता वाचनालयात जावे लागत नाही; सर्व काही मोबाईल फोन वर मिळते. आताच्या जगात फक्त वाचनापर्यंत मर्यादित राहून जमणार नाही, मिळालेल्या ज्ञानावर विचार, मनन केले पाहिजे आणि त्याच्यावर अमल सुद्धा केले पाहिजे. मिळालेले ज्ञान वाटले पाहिजे, त्याने ते वाढते; त्यावरती कृतीही केली पाहिजे. वाचनासाठी नवीनतम सोयी आता उपलब्ध आहेत, आणि आजच्या बदलत्या आणि माहिती प्रधान जगात यशस्वी व्हायचे असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाहीच. वाचाल तर वाचाल या पेक्षा मी तर म्हणेन “वाचाल तरच वाचाल”.

अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की

म्हणून

दररोज किमान एक तास दुसऱ्यांसाठी नाही तर स्वत:साठी वाचायलाच हवे, ही एक चांगली सवय आहे

तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण एकच गोष्ट करू शकते, ते म्हणजे

वाचन

भारत पाटील, लेखक

शिका विकायला कोणतीही गोष्ट! 

(वाचा - click)

51 ऑनलाईन बिझनेस आयडिया! 

(वाचा - click)



e4 उद्योजक, महाराष्ट्र!


मित्रांनो, तुम्ही जर एखाद्या एक्स्ट्रा इन्कम सोर्स निर्माण करण्यासाठी ऑनलाईन पुस्तके विकून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे, या बद्दल जाणून घेण्यासाठी इच्छुक असाल तर खालील बटणावर क्लिक करून आम्हाला व्हाट्सअप मेसेज करा

Chat Now




-----------------------------------------


(e4 मराठी उद्योजक)™


इथे उद्योग, व्यवसाय, करीअर, व्यक्तिमत्व विकास, सक्सेस मंत्रा, वाचनीय पुस्तके, इंग्रजी, फ्रिलांसिंग जॉब्स इत्यादी विषयांवरील 

अनेक लेख वाचण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा 

Click Now


e4 Udyojak

 E-mail : e4udyojak4u@gmail.com


Copyright 2022 © e4 Udyojak (All Rights Are Reserved)

Comments

  1. अतिशय सुंदर विचार

    ReplyDelete
  2. नक्कीच, बरोबरच आहे, पण येथे अजून एक छोटी गोष्ट नमूद करावी असे वाटत आहे, खरे तर कॉमन सेन्स आहे, पण तरी सांगितली पाहिजे की वाचन काय करतो त्याला ही फार महत्व आहे, काही ही फालतू विषय वाचनात वेळ वाया घालवू नये, ज्याचा आपल्या मानसिक, बौद्धिक, आर्थिक, शारीरिक उन्नती ला उपयोग असेल तेच वाचले पाहिजे व पहिल्या ४ ते ५ वाक्यात पुढील लेखाची दिशा ओळखून ठरवावे की वाचावे की वाचू नये, पुस्तकाचे नाव किंवा मुखपृष्ठ पाहून ही हे समजू शकते

    ReplyDelete
  3. सुपर,,,,,,
    प्रेरणा दाई. ,,,,लेखन आणि ग्रुप

    ReplyDelete
  4. सुपर,,,,,,
    प्रेरणा दाई. ,,,,लेखन आणि ग्रुप

    ReplyDelete
  5. Very nice 👌👌

    ReplyDelete
  6. खूप खूप धन्यवाद सर्वांचे

    ReplyDelete

Post a Comment