Skip to main content

आजच्या पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांकडून काय शिकावे?



यशाचा आणि वय, अनुभवाचा संबंध नसतो 

महाराजांनी वयाच्या 17 व्या वर्षी तोरणगड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले होते.

स्पर्धक मोठा आहे म्हणून घाबरायचं नसतं
मुघल, निजाम, आदिलशहा असे मोठमोठे विरोधक असतानाही महाराजांनी स्वराज्य स्थापन केलेचं.

अंधश्रद्धेला तिलांजली द्या, कष्ट करा, ध्येय बाळगा.
कोणत्याही निष्पाप प्राण्याचा बळी न देता स्वतःची करंगळी कापून मंदिरात स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

सुरुवात करण्यावर भर द्या, कमतरतेवर लक्ष देऊ नका.
रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेताना बाल शिवबासोबत फक्त आठ दहा मावळे होते.

सर्वोत्तम राजनीती
रक्ताचा एकही थेंब न सांडता महाराज आग्रा येथील औरंगजेब बादशहाच्या 2,60,000 फौजेच्या नजर कैदेतून सहीसलामत बाहेर पडले. हा जागतिक राजनीतीचा सर्वोत्तम नमुना आहे.

सहकारी चांगले निवडा
आधी लगीन कोंढण्याचे मग रायबाचे असे म्हणत महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे सहकारी हीच महाराजांची खरी ताकद होती.

माघार घेणे सुद्धा काही वेळेस आवश्यक असते.
महाराज कित्येक वेळा परिस्थिती पाहून माघार घेत. यामुळे होणारे नुकसान टळत आणि नव्याने तयारी करण्याची संधी मिळे, यात कोणताही कमीपणा नाही.

संपलं असं जेव्हा वाटेल तेव्हा जास्त खंबीर व्हा.
पुरंदरच्या तहात मुघलांना 23 किल्ले दिल्यानंतर स्वराज्य संपले असेच सगळ्यांना वाटले होते...महाराज वगळता.

संकटाला घाबरू नका, संकटकाळी स्वत: नेतृत्व करा.
अफजल खानाचे संकट महाराजांनी स्वतः हाताळले होते. शांत राहून प्रत्येक निर्णय घेऊन योग्य पद्धतीने अमलात आणला होता.
_____________________________________

जर तुम्हाला यशस्वी उद्योजक व उत्तम विक्रेता व्हायचे असेल तर मराठी युवा उद्योजक भारत पाटील सर लिखित 'शिका विकायला कोणतीही गोष्ट' हे पुस्तक (eBook) तुम्ही एकदातरी वाचायलाच हवे.

वाचण्यासाठी क्लिक करा - Click Here

Comments