Skip to main content

जर तुम्हाला यशस्वी उद्योजक आणि उत्तम विक्रेता बनायचे असेल तर...

 



जर तुम्हाला यशस्वी उद्योजक व उत्तम विक्रेता व्हायचे असेल तर
मराठी युवा उद्योजक भारत पाटील सर लिखित 
'शिका विकायला कोणतीही गोष्ट' 
हे पुस्तक (eBook) तुम्ही एकदातरी वाचायलाच हवे.
_______________________
आता तुम्हाला या पुस्तकाचा जास्तीत-जास्त फायदा कसा करून घेता येईल, ते पाहुयात!
Think Before Act
मित्रांनो, जोपर्यंत या मार्गदर्शक पुस्तिकेत सांगितलेले विचार आणि कृती तुमच्या रोजच्या जीवनात अंमलात येत नाही तोपर्यंत ते वारंवार वाचत राहावे, त्यावर मनन, चिंतन करावे आणि कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. 
कारण व्यवसाय कोणताही असो प्रत्येक व्यवसाय मालकांसमोर खालील तीनच प्रश्न असतात.
पहिला प्रश्न -
मी जास्तीत जास्त कस्टमर कसे मिळवू? 
दुसरा प्रश्न -
मी जास्तीत जास्त रेव्हेन्यू (सेल्स) कसा वाढवू, 
जास्तीत जास्त ऑर्डर्स कशा मिळवू?
तिसरा प्रश्न -
मी जास्तीत जास्त प्रॉफिट कसा कमवू?
बरोबर ना! परंतु उद्योजक मित्रांनो 
ह्या प्रश्नांकडे तुम्ही जर नीट बघितलं तर हे मुळात मुख्य प्रश्नच नाहीयेत. 
तर हे आहेत Results! 
होय, तुमचे कस्टमर्स किती असणार, किती रेव्हेन्यू मिळणार आणि किती तुम्ही प्रॉफिट मिळवणार या तीन गोष्टी ज्या आहेत, त्या आहेत रिझल्ट्स ज्या अंतिम म्हणजे सर्वात शेवटी असतात. तर हे रिझल्ट्स मिळवण्यासाठी आपल्या व्यवसायामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात. काही योग्य बदल करावे लागतात. काही योग्य निर्णय घ्यावे लागतात. तर या एकूण सर्व गोष्टींपैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट करावी लागते ती म्हणजे - 
Right Actions on Time !
होय, कोणत्याही व्यवसायाचा सेल्स वाढविण्यासाठी Actions तर घ्याव्या लागतात, हे सर्वांनाच माहीत आहे परंतु नेमक्या त्या Actions कोणत्या, केव्हा घ्यायच्या ते कळत नाही, त्यात नेमकं करायचं काय, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोण-कोणते पाऊले उचलायचे, Marketing, Planning कसे करायचे, काय-काय निर्णय घ्यायचे हे बऱ्याच जणांना उमगत नाही. तसेच सेल्स करण्याच्या काही ट्रिक्स व टेक्निक्स माहीत नसणे. यामुळे सुद्धा पाहिजे तसा सेल्स होत नाही आणि मग व्यवसायही वाढत नाही. 

तर यासाठीच कोणत्याही व्यावसायाचा सेल्स 10× पटीने वाढविण्याकरिता या पुस्तकात  Action Steps (Tips) सांगितल्या आहेत ज्या Step-By-Step प्रत्येकाला यशोशिखरावर पोहचवू शकतात. छोटे-मोठे व्यापारी असो, सेल्स पर्सन असो, ज्यांचा व्यवसाय वाढणे बंद झाले असे किंवा ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, सेलिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे अशा प्रत्येक माणसाला नक्कीच हे पुस्तक एक उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून १००% फायद्याचे ठरेल.

या पुस्तकात तुम्हाला व्यवसाय यशस्वी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या 50 टिप्स शिकायला मिळणार आहेत. 
  • जशा की व्यवसाय सुरू करण्याआधी आपल्याला काय-काय माहीत पाहिजे. व्यवसाय नेमका कोणता निवडायचा, तो कसा निवडायचा व कसा सुरू करायचा. त्याची पूर्वतयारी कशी करायची.
  • जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत कसे पोहचायचे. संभाव्य ग्राहक शोधून Targeted कस्टमर कसे मिळवायचे. त्यांचे स्ट्रॉंग नेटवर्क कसे तयार करायचे. 
  • ग्राहकांना खुश आणि समाधानी ठेवण्यासाठी कोण-कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ग्राहकासोबत कसे बोलायचे. सेल क्लोज कसा करायचा. 
  • तुमची वस्तू किंवा सेवा घेणारे ग्राहक वारंवार, पुनःपुन्हा येण्यासाठी काय करावे. तुमच्या ग्राहकांनाच तुमच्या व्यवसायाचे ब्रॅंड ॲंम्बॅसिडर कसे बनवायचे. 
  • जेव्हा तुमचे ग्राहक दाद देत नाही, खरेदी करीत नाहीत, सेवा स्वीकारीत नाहीत तेव्हा काय कारणे असू शकतात. तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे. 
  • तुमच्या ग्राहकांची गरज, प्रोडक्टची किंमत आणि नफा-तोट्याचे गणित समजून जास्तीत जास्त सेल करून जास्तीत जास्त प्रॉफिट कसा कमवायचा. 
  • नुकसान, तोटा होऊ न देण्यासाठी काय करावे. उत्पादनाची योग्य किंमत कशी ठरवायची. स्पर्धकाशी compete कसे करायचे. 
  • Life व Business Goals ठरवून कसे पुर्ण करायचे. 
  • नवीन व्यवसाय सुरू किंवा वाढवण्यासाठी बाजारपेठेचा अभ्यास कसा करायचा. Long-term बिझनेस चालवण्यासाठी Planning कशी करायची. 
  • तुमच्या दुकानातील वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी ग्राहक जेव्हा येतो तेव्हा तो प्रसंग त्याला संस्मरणीय, आठवणीत राहणारा, आठवण बनून राहणारा व्हायला हवा, यासाठी काय करायचे. 
  • व्यवसायात यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शकाची, गुरूची निवड कशी करायची. तुमचे सहकारी, कामगार (Man Power) यांचे व्यवस्थापन कसे करायचे. 
  • यशस्वी उद्योजक व उत्तम विक्रेता होण्यासाठी काय करावे. विक्रेत्यामध्ये कोणते गुण असावेत आणि कोणते दोष नसावेत. 
  • व्यवसायात होणाऱ्या बदलांना कसे सामोरे जायचे. मार्केटचा आणि ग्राहकांचा कल कसा ओळखायचा‌‌. ग्राहकांची मागणी ओळखून आपल्या वस्तू, उत्पादन किंवा सेवेत कसे बदल करायचे.
अशा अजून बऱ्याच गोष्टी या पुस्तकात शिकायला मिळतील. म्हणून जे स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित आहे आणि ज्यांना स्वतःचा व्यवसाय वाढवायचा आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी हे पुस्तक एक टर्निंग पॉईंट ठरू शकते!
मनोगत - विशाल गुधळे पाटील, युवा उद्योजक!
__________________________


पुस्तकाचे नाव - शिका विकायला कोणतीही गोष्ट!
भाषा - मराठी
एकूण पाने - 93
किंमत -  Rs. 180/- Rs. 90/-
डाउनलोड लिंक - Buy Now

सुचना - वरील Buy Now या बटणावर क्लिक करा. पेमेंट सक्सेसफुल झाल्यावर आपोआप तुम्ही WhatsApp वर याल व आम्हाला पेमेंट झाल्याचा मेसेज येईल. लगेच तुम्हाला तुमचे पुस्तक (PDF) पाठवले जाईल.
__________________________

या पुस्तकाचे अधिकृत विक्रेते बनून तुमचा स्वतःचा एक Side Business सुरू करा. - Read More

Comments