Skip to main content

ह्या ४ चुका टाळा - श्रीमंतीकडे वाटचाल सुरू होईल!

  

l-iil_15922932432mfETP.jpeg

Book Review -

हे पुस्तक तुम्हाला श्रीमंत आणि यशस्वी होण्यासाठी मदत करेल.

MRP - 30/- Only

Language - Marathi

Download Now


जगातला 90 टक्के पैसा 10 टक्के लोकांकडे आहे आणि 10 टक्के पैसा जगाच्या 90 टक्के लोकांकडे. म्हणजे जगातील 90 टक्के लोक मध्यमवर्गी आणि गरीब आहे.

हे मध्यमवर्गीय आणि गरीब लोक कळत-नकळत चार मोठ्या चुका करतात. त्यामुळे ते कधीच श्रीमंत होत नाही. त्यामुळे यशस्वी आणि श्रीमंत लोक ज्या चुका करत नाहीत तर त्या चुका तुमच्याकडून अनावधानाने होत असतील तर आत्ताच त्यामध्ये सुधारणा करायची वेळ आहे. 


1) पूर्ण लक्ष बचतीवर केंद्रित करणे

मित्रांनो, मध्यमवर्गीय आणि गरीब लोक आपले पूर्ण लक्ष पैशाच्या बचतीवर केंद्रित करतात. याचा अर्थ असे म्हणणे नाही की बचत करणे वाईट आहे. पण हे लोक आपली सगळी ऊर्जा, एनर्जी नेहमी बचत करण्यामध्येच खर्च करतात. त्यांचे लक्ष कधी आपले उत्पन्न कसे वाढवता येईल याकडे जातच नाही. हे लोक बाजारामध्ये पन्नास शंभर रुपये वाचवण्यासाठी 2-2 तास घालवतात. त्यांना हे समजत नाही की हेच दोन तास त्यांनी काही प्रोडक्टिव काम केले तर ते भविष्यात पाचशे ते हजार रुपये कमवू शकतात. अशी अनेक लोक असतील की जे बचत खूप करतात पण त्याचे उत्पन्न 5 वर्षांपूर्वी जेवढे होते तेवढेच आज आहे. म्हणून नुसता बचत करण्यावर फोकस न ठेवता आपले उत्पन्न कसे वाढवता येईल यावर जास्त लक्ष केंद्रित करायला हवे.


2) नेहमी लायबिलिटीवर खर्च करणे

मित्रांनो, ही सर्वात मोठी चूक गरीब आणि मध्यमवर्गीय लोक करत असतात म्हणजे ते सर्वात जास्त खर्च लायबिलिटीवर करतात आणि असेटवर फार कमी करतात. लायबिलिटी म्हणजे ज्या गोष्टीवर तुम्ही खर्च करता ते तुमचा पैसा नेहमी तुमच्याकडून काढून घेते. उदाहरण म्हणजे तुम्ही कार घेतली. त्या कारला पेट्रोल लागते, मेन्टेनन्सला खर्च लागतो आणि परत एक-दोन वर्षांनी ती कार विकायला गेलात तर त्याची अर्धीपण किंमत येत नाही. म्हणजे थोडक्यात कार ही लायबिलिटी आहे जे तुमच्याकडून पैसे काढून घेते.

पण तुम्ही असेट वर खर्च केला तर ते तुमचे पैसे वाढवते. उदाहरण म्हणजे तुम्ही चांगल्या कंपनीचे स्टॉक्स विकत घेतले, जमीन घेतली, सोने-चांदी घेतले तर या गोष्टी काही वर्षांनंतर तुमचे पैसे वाढून देणारे असतात.


म्हणून आपण गरज नसताना आपल्या लायबिलिटीवर जास्त खर्च करू नये, जसे की महागडे बूट, कपडे, मोबाईल, बाईक आणि कार इत्यादी अनेक वस्तू घेणे. काही तर कर्ज काढून, क्रेडिट कार्डचा वापर करून या वस्तू खरेदी करतात. असे म्हणणे नाही की तुम्ही ह्या वस्तू घेऊ नका. परंतु त्याआधी तुमचे असेट वाढवा. त्या पैशांमधून मग हौस मौज करा, कर्ज काढून नाही. 


3) स्वतःच्या प्रगतीसाठी खर्च न करणे

मित्रांनो, सामान्यता आपण आपल्या प्रगतीसाठी पाहिजे तसा खर्च करत नाही. आपल्याकडे सर्वात महत्त्वाची संपत्ती जी काही असेल ती म्हणजे आपली बुद्धिमत्ता आणि आपला मेंदू आहे. जेवढा जास्त तुम्ही त्याला प्रगत कराल तेवढे तुमचे उत्पन्न वाढेल. श्रीमंत लोक नेहमी स्वतःवर खर्च करत असतात. त्यांच्या क्षेत्रात ते वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम, सेमिनार, वर्कशॉप करत असतात. ज्ञान मिळवण्यासाठी अनेक पुस्तकांचे वाचन करत असतात. पण मध्यमवर्गीय सगळीकडे खर्च करतात पण स्वतःवर नाही. म्हणून अशा लोकांच्या जीवनात काहीच प्रगती होत नाही. 

आंतरराष्ट्रीय लेखक रोबिन शर्मा म्हणतात

तुमचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर तुमची शिकण्याची गती तिप्पट करा.



4) वेळ वाया घालवणे

श्रीमंत लोक नेहमी त्यांच्या वेळेचा आदर ठेवतात अनेक गदर करतात. त्यांना माहीत असते की आयुष्यामध्ये वेळ किती महत्त्वाचा असतो. त्यामुळे ते वेळेचा योग्य ठिकाणी वापर करतात. म्हणून ते श्रीमंत असतात. पण मध्यमवर्गीय लोकांना वेळेची किंमत नसते. त्यांचा बराच वेळ टीव्ही पाहत बसण्यात घालवतात, एकमेकांबद्दल विनाकारण चर्चा करण्यात घालवतात. अशा लोकांना मनोरंजन खूप प्रिय असते. त्यामुळे ते सतत व्हाट्सअप, फेसबुक वर वेळ घालवतात. युट्युब आणि टिक-टॉक वर कॉमेडी व्हिडिओ बघत असतात. आणि अशामुळे त्यांचा वेळ कधी निघून जातो हे त्यांना पण समजत नाही आणि मग ते नशिबालाच दोष देत बसतात की आमच्या आयुष्यात श्रीमंती लिहिलेलीच नाही, आमचं नशीबच फुटक आहे. पण खरं तर ते या परिस्थितीला स्वतः जबाबदार असतात. 


म्हणून हा फालतू जाणारा वेळ त्यांनी जर सन्मार्गी लावला तर त्यांना यशस्वी आणि श्रीमंत होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. असे नाही की आयुष्यात मनोरंजनाची गरज नाही पण त्याची एक मर्यादा आहे. ‌ दिवसातला एखादा तास मनोरंजन ठीक आहे. पण चार-चार, सहा-सहा तास जर लोक टीव्ही पाहण्यात व सोशल मीडियावर घालवत असतील, तर त्यांचे भविष्य काय असेल हे सांगायला ज्योतिषाची गरज नसेल. 


जो कोणीही ह्या ४ चूका टाळेल, तो श्रीमंतीकडे वाटचाल सुरू करेल.

_____________________

Best Selling E-Books

जर तुम्हाला यशस्वी उद्योजक आणि उत्तम विक्रेता व्हायचे असेल तर

शिका विकायला - कोणतीही गोष्ट!



खालील Download Now वर क्लिक करा आणि व्हॉट्सॲपवर ई-बुक मिळवा

________________________

Download Now


E-Book Marketing Service

इतके कस्टमर मिळतील 
की तुम्हाला सांभाळणं कठीण होऊन जाईल

'शिका विकायला - कोणतीही गोष्ट' व 'व्यवसाय तुमचा मार्केटिंग आमची'
हे आहे आपले २ ई-बुक जे प्रचंड वेगाने खपले जात आहे. या ई-बुक मध्ये आम्ही तुमच्या व्यवसायाची 
डिजिटल जाहिरात 
एका किंवा अर्ध्या पानावर प्रसिद्ध करू तेही लाईफ टाईम!  
-------------------------------------------------------
Copyright © e4 उद्योजक महाराष्ट्र, 2021

Comments