Skip to main content

काहीही झालं तरी चालेल पण तुमचा व्यवसाय बंद होऊ देऊ नका!

 


कुठलाही व्यवसाय टिकवण्यासाठी मुळात आपल्याकडे एक अतिशय फार महत्त्वाची गोष्ट पाहिजे ती म्हणजे 'संयम'. आज मी तुम्हाला व्यवसाय अपयशी होण्याची कारणे व आपण त्याचा सामना कसा करावा हे सांगणार आहे. मित्रानो आज व्यवसायासाठी फार अनुकूल वातावरण आहे बरेच युवा व्यवसायाकडे वळत आहेत पण जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिले तर असे दिसते की जे 100% उद्योग चालू होतात त्यातील 90% हे पहिल्या 5 वर्षात बंद पडतात आणि राहिलेल्या पैकी 90% पुढील 5 वर्षात बंद पडतात तुम्हाला आश्चर्य वाटले असेल पण मित्रानो हे मी नाही तर आकडेवारी बोलत आहे यावरून तुम्हाला कळले असेलच की उद्योग करने हे खायचं काम नाही.


१) बरेचशे लोग त्यांच्या ऑफिस किंवा दुकानाच्या इंटरीअर वर खर्च करतात मोठ्याने ओपनिंग करतात पण जो व्यवसायाचा कणा आहे ते म्हणजे जाहिरात याकडे दुर्लक्ष होते


2) महागडे फर्निचर , लायटिंग यावर जास्त खर्च होते तेच पैसे व्यवसायवाढी वापरावेत


3) पैसे वाचवण्यासाठी विनाअनुभवी लोकांना कामावर ठेवणे, 4 लोकांमागे 1 तरी अनुभवी व्यक्ती असावा


4) पेमेंट साठी आलेले फोन न उचलणे, ही चूक जेष्ठ व्यावसायिक सुद्धा करतात हे त्वरित बंद करा यामुळे तुमची विश्वासार्हता कमी होते


5) आपली देणी वेळेवर चुकती न करणे, काही अडचण असल्यास ती समोरच्याला सांगा थोडा वेळ मागून घ्या


6) व्यवसायातून आलेला पैसा चैनीसाठी खर्च करणे , आपल्याला उपजीविकेसाठी लागेल तेवढीच रक्कम घेऊन बाकीची उद्योगातच गुंतवा


7) खर्चाचा हिशोब न ठेवणे,


8) पहिल्या काही दिवसात नफा होत नाही त्यामुळें खचून व्यवसाय बंद करणे, पाहिले काही दिवस नफा होत नाही हे गृहीत धरूनच चाला


जशी व्यवसाय अपयशी होण्याची कारणे आहेत तशेच व्यवसाय करण्याचे फायदे पण आहेत, काही लोक व्यवसाया सुरू केल्यावर आपल्या नोकरदार मित्रांकडे पाहतात त्यांना जास्त पगार असतो त्यामुळे हे पण नोकरी करतात पण लक्षात ठेवा मित्रानो आपल्याला आपल्या स्वप्नातले आयुष्य जगायचे असेल तर उद्योग शिवाय पर्याय नाही जर नजर उचलून वर बगा आज जे मोठ्या गाड्या, बंगले, आलिशान जगत आहेत ते सर्व व्यवसायीकच आहेत. नोकरी तुम्हाला उपाशी मरु देणार नाही पण मनासारखे जगुपन देत नाही. एकच आयुष्य आहे त्यामुळे उठा आणि उद्योजक व्हा.

--------------------------------------

e4 उद्योजक, महाराष्ट्र!

इथे उद्योग, व्यवसाय, अर्थक्रांती, पुस्तके, नवीन कोर्सेस, सक्सेस मंत्रा, फ्रिलांसिंग जॉब्स व वर्क फ्रॉम होमच्या संधी इ. विषयांवरील लेख व माहिती वाचायला मिळते!
-----------------------------------------
Best Selling E-Books
विकायला शिका - कोणतीही गोष्ट!

तुम्हाला जर यशस्वी उद्योजक आणि उत्तम विक्रेता व्हायचे असेल तर हे बुक कायम तुमच्या सोबत ठेवा

-------------------------------------------------------
Copyright © e4 उद्योजक महाराष्ट्र, 2021

Comments

  1. Download Now

    https://drive.google.com/file/d/134aGqufOmJprUSN3DATRlVIUNyXqytFo/view?usp=drivesdk

    ReplyDelete

Post a Comment