e4 English Class -
करोनाच्या जगभरातल्या प्रादुर्भावामुळे जवळपास संपूर्ण जग लॉकडाऊन स्थितीत आहे. भारतातही लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे जगभरातील किमान ६० टक्के विद्यार्थीवर्ग शाळा, महाविद्यालयांपासून दूर आपल्या घरी बसलेला आहे. या लॉकडाऊन काळात विद्यार्थी आणि इतर सर्वजण एकतर आपल्या आवडी-निवडी जोपासत आहेत किंवा घरून काम करत आहेत. जे घरून काम करत नाहीत, त्यांच्यापुढे वेळ कसा घालवायचा हा मोठा प्रश्न आहे. एखादा नवा छंद जोपासण्यासाठी किंवा काहीतरी नवं शिकण्यासाठी हा काळ उत्तम आहे. ज्यांना इंग्रजी बोलायला शिकायचं आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. घरच्या घरी राहून इंग्लिश स्पीकिंगचे स्कील शिकता येऊ शकतील. तुमचं स्पोकन इंग्रजी सुधारण्यासाठी आम्ही तुम्हाला देतोय काही टिप्स…
1) स्वतःशी बोला :
एक कुठलाही तुमच्या आवडीचा विषय निवडा. त्या विषयावर इतरांशी इंग्रजीत चर्चा करा. स्वत:शी बोलण्याचा प्रयत्न करा. त्या विषयाशी संबंधित नवे शब्द शिकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आरशासमोर उभं राहून देखील बोलण्याचा प्रयत्न करा. आरशासमोर बोलत असताना तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहा. हा सराव नवे विषय आणि नवे शब्द घेऊन पुन्हा पुन्हा करा. असे करण्याने घरच्या घरी तुम्ही हळूहळू चांगलं इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करू शकता.
2) रेडिओ, टीव्ही किंवा पॉडकास्ट
स्पोकन इंग्रजीसाठी रेडिओ किंवा पॉडकास्ट ऐकणे, इंग्रजी बातम्या किंवा तुमचा आवडता इंग्रजी सिनेमा पाहणे हा एक उत्तम सराव आहे. भाषा बोलण्यासाठी ती ऐकणेदेखील तितकंच महत्त्वाचं असतं. तुम्हाल न्यूज टीव्हीचा अँकर किंवा सिनेमातली पात्र शब्दोच्चार कसे करत आहेत, ते कळेल. सिनेमा पाहताना कलाकार कशापद्धतीने डायलॉग बोलत आहेत, ते पाहिल्यावर तुम्हाला भाषा चांगल्या देहबोलीसह कशी बोलायची याचंही आकलन होईल.
3) इंग्रजी नाटकं, ऑडिओ बुक्स ऐका
लॉकडाऊन काळात चांगली ऑडिओ पुस्तके किंवा ऑडिओ नाटके ऐकण्याचं प्रयत्न करा. त्या नाट्यात किंवा पुस्तकांमध्ये शब्दांचा वापर कसा केला आहे त्याचा अभ्यास करा. ऑडिओ नाट्य किंवा ऑडिओ पुस्तके ऑनलाइन उपलब्ध करून देणाऱ्या अनेक वेबसाईट्स आहेत. बीबीसी सारख्या वाहिन्या रेडिओ नाट्य (नभोनाट्य) होस्टदेखील करतात.
4) मित्रांशी, कुटुंबीयांशी बोला
मित्रांशी बोलायचंय पण ते फोनवरंच बरं का. मित्रांशी, कुटुंबीयांशी इंग्रजीत संवाद साधा. असे केल्याने तुम्हाला कळेल की बोलताना तुम्ही कोणत्या चुका करत आहात. इंग्रजी बोलतानाचे तुमचे कच्चे दुवे कोणते ते शोधा आणि त्यावर काम करा.
5) एक चांगला मेंटर शोधा जो तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत पटकन पोहचू शकेल
जर स्वतःला आत्मविश्वास येत नसेल आणि स्वतःला स्वत:च्या चुका शोधून काढता येत नसेल तर तुम्हाला समजून सांगणारा एक मेंटर असावाच. यामुळे तुमचा Performance सुधारण्यास खूप मदत होते. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढण्यास चांगली मदत होते. यासाठी e4 English Class चा तुमच्या इंग्रजी भाषेचे Spoken Skills वाढविण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. आम्ही तुमच्या साठी Demo Class अरेंज करतो, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या इंग्रजी भाषेचे SWOT Analysis समजते. यामुळे तुम्हाला कशाप्रकारे तुमचे इंग्रजी संवाद कौशल्य सुधारता येईल, याचं पुर्णता आकलन येते.
सविस्तर माहितीसाठी खालील बटणावर क्लिक करा
Khoop chaan
ReplyDelete