आंतरराष्ट्रीय लेखक रॉबर्ट टी कियोसाकी यांचे जगातील बेस्ट सेलिंग बुक 'Business of the 21st Century' या पुस्तकातील प्रस्तावनेची माहिती या लेखात दिलेली आहे!
प्रस्तावना -
अर्थव्यवस्थेच्या चिंधड्या उडालेल्या आहेत आणि अजूनही आपण नोकरी करत असाल तर आपण भविष्यात अडचणीत आलेलो असेल, अशा परिस्थितीत पुढे काय करायचे आणि कोणते पावले टाकायचे हे माहीत असेल तर वाईट परिस्थितीचे चांगल्या परिस्थितीत रूपांतर करता येते. मंदीतून संधी साधता येते, असे लेखक म्हणतात.
आपले आयुष्य आपणच घडविण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे हे लेखकाला या पुस्तकातून सांगायचे आहे. आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवावे, संपत्ती कशी निर्माण करावी व ती कशी राखून ठेवावी, हे यातून आपल्याला शिकायला मिळेल!
पैसा कसं काम करतो हे सत्य एकदा उमगले आणि एकविसाव्या शतकातील उपलब्ध असलेल्या व्यवसायाच्या संधीचे ज्ञान झाले की आपण आपल्या इच्छेनुसार स्वतःचे आयुष्य घडवू शकतो.
जे आज आयुष्याच्या निर्णायक वळणावर उभे आहेत. ज्यांच्यावर सध्याच्या आर्थिक पेच प्रसंगामुळे परिणाम झालेला आहे आणि आपले आर्थिक भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी आता काय करावे हे समजेनासे झाले आहे, अशा अनेक लोकांसाठी हे पुस्तक खूप उपयोगी असेल.
पुढे लेखक म्हणतात की
तुमच्या पैशाच्या व्यवस्थेची जबाबदारी तुम्ही घ्या
किंवा
आयुष्यभर दुसऱ्यांच्या आज्ञा पाळा.
तुम्ही पैशांचे मालक असाल किंवा गुलाम असाल,
निवड तुमची!
लेखकाचे मनोगत -
मी आयुष्यात अगदी विश्वास ठेवू नये इतका भाग्यवान आहे. खरी संपत्ती कशी उभारावी हे दाखवणारे विश्वासू सल्लागार आणि अनुभव मला लाभले. गेली दहा वर्ष मी माझे आयुष्य लोकांना खरी संपत्ती निर्माण करून एकविसाव्या शतकासाठी आपले आयुष्य कसे बदलावे हे शिकवण्यासाठी, अत्यंत परिणामकारक आणि व्यवसायिक मार्ग शोधून काढण्यासाठी अर्पण केलेले आहे.
अनेक वर्षांच्या सखोल संशोधनानंतर मला व्यवसायाचा असा एक नमुना आढळून आला की ज्यात अनेक लोकांना आपल्या आर्थिक आयुष्यावर, भविष्यावर आणि विधिलिखितावर ताबा मिळवून देण्याचे सामर्थ्य आहे.
आणखी एक गोष्ट, जेव्हा मी खऱ्या संपत्ती विषयी बोलत असतो तेव्हा मी फक्त पैशाबद्दल बोलत नसतो, पैसा हा त्याचा एक भाग आहे. या पुस्तकात मी तुम्हाला व्यवसाय आणि तो तुम्ही उभा करण्याची गरज का आहे हे सांगणार आहे. यातून फक्त तुम्ही करत असलेल्या व्यवसायात बदल होत नाही तर तुमच्यातही बदल होतो. तुमच्यासाठीचा आदर्श व्यवसाय कसा वाढवाल हे मी तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून शिकवेल!
तर मित्रांनो,
शाळेत आणि कॉलेजमध्ये आपल्याला 'पैसा' या विषयावर जास्त कोणी शिकवत नाही. तसेच व्यवहार ज्ञान सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळत नाही. अशावेळी हे पुस्तक आपल्याला अर्थसाक्षर होण्यासाठी खूप मदत करेल.
तुम्हाला जर या पुस्तकातील लेख वाचायला पाहिजे असतील तर मला व्हाट्सॲपला मेसेज करा. हे पुस्तक मराठी भाषेत उपलब्ध आहे. ते मिळवण्यासाठी खालील (Access Now) या बटणावर क्लिक करा.
Price - Rs. 299 (Save Rs. 250)
Pay - Rs. 49 Only
-------------------------------------
e4 team
तुमचा लेख प्रसिद्ध करण्यासाठी आमच्या एडमिनला मेसेज किंवा कॉल करा
e4 service द्वारा संचलित
(पोस्ट कॉर्नर+)™ (महत्त्वाचे बोलू काही)
या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपमध्ये
आपलं स्वागत आहे.
इथे उद्योग, व्यवसाय, अर्थक्रांती, पुस्तके, नवीन कोर्सेस, सक्सेस मंत्रा, फ्रिलांसिंग जॉब्स व वर्क फ्रॉम होमच्या संधी, इ. विषयांवरील लेख व माहिती वाचायला मिळेल!
Join | Learn | Share | Earn
----------------------------------------------------------------
E-mail : e4service4u@gmail.com
Comments
Post a Comment