
एखादं ध्येय साध्य करण्यासाठी, चांगली टक्केवारी मिळवण्यासाठी, आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रत्येकजण अथक परिश्रम घेत असतो. हार्डवर्क करणारे एकाचवेळी खूप जण असू शकतात. त्यामुळे, ‘हार्ड’ काम अधिक ‘स्मार्ट’पणे कसं करता यालाही महत्त्व प्राप्त झालं आहे.
‘हार्डवर्क’ म्हणजे केवळ गाढव काम नव्हे. ते अधिक स्मार्टपणे कसे करता येईल, यासाठी काही उपयुक्त टिप्स.
मल्टिटास्किंग :
कल्पकतेचा स्वीकार :
रूटीन अभ्यास अधिक वेगळ्या पद्धतीने, कल्पकतेने करण्यास नक्कीच वाव असतो. मात्र नव्या संकल्पनांसह गतिमानतेने काम करताना गुणवत्तेला फटका बसणार नाही, याची खात्री करा.
अपडेट राहा :
तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणामुळे अभ्यास अधिक सोपा बनू शकतो. हे बदल आत्मसात करा, स्वीकारा आणि त्यांचा वापर करून अभ्यास करणं, संकल्पना सोप्या करून घेणं शक्य होतंय का, याचा आढावा घ्या.
चुकांमधून धडे घ्या :
स्वत:च्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न कराच; पण त्याचबरोबर इतरांच्या चुकांमधूनही बोध घ्यायला शिका. यशस्वी करिअर करायचं असेल, तर चुका टाळता आल्या पाहिजेत.
बदल स्वीकारा :
बदल हा जीवनाचा आणि पर्यायाने प्रत्येक कार्यक्षेत्राचा स्थायीभाव आहे. त्यामुळे बदलांना विरोध करण्याऐवजी त्यांना स्वीकारा. प्रत्येक बदल सोबत नवी संधी घेऊन येतो, हे विसरू नका.
टीमवर्क :
एखादं ध्येय गाठण्यासाठी, उद्दिष्ट्यपूर्तीसाठी टीमवर्क आवश्यक आहे. चांगली टीम निवडा. प्रत्येकाच्या कौशल्य आणि क्षमतांनुसार अभ्यास करा.
हार्डवर्कच्या बळावर चांगले मार्क्स पदरी पडून उत्तम करिअरचा पाया रचता येईल. तुम्ही रोज किती अभ्यास केला किंवा त्यासाठी किती जीवापाड मेहनत केली, याकडे वैयक्तिक पातळीवर शिक्षक लक्ष देऊ शकत नाहीत. अंतिम ध्येय पूर्ण झालं की नाही यावरच तुमची क्षमता सिद्ध होते.
Comments
Post a Comment