Skip to main content

मोठी स्वप्ने पाहा!

 


माहिती स्त्रोत : कोरा वेबसाईट

तुम्हाला अल्केमिस्ट ह्या पुस्तकाची कथा माहीती आहे का.. ह्या पुस्तकात नायकाला रोज रात्री झोपताना एकच स्वप्न सतत पडत असतं आणि ते स्वप्न म्हणजे त्याला एक भलामोठा खजिना मिळतोय आणि त्या खजिन्यामुळे त्याचे संपूर्ण आयुष्याचे स्वप्न पूर्ण होतेय. नेहमी प्रमाणे तो ह्या स्वप्नाला घेऊन सांशक असतो, त्याचा मनात सारखी चल-बिचल होत असते. त्याचा मनात एकच प्रश्न येतो की ह्या स्वप्नाला काही अर्थ असेल की नाही? अल्केमिस्ट हे पुस्तक आपला नायक या स्वप्नाचा पाठपुरावा कसा करतो ह्याबद्दल आहे.


काही परिचयाची उदाहरणे पाहूया :


बिल गेट्स आणि पौल एलन यांनी मायक्रोसॉफ्टचे सगळ्यात पहिले संगणक एका लहानश्या गॅरेजमध्ये बनवले होते. 



महेंद्रसिंग धोनी 2001 ते 2003 साली खडकपूर जंक्शन इथे टीटीई (तिकीट चेकर) होता. 



अब्दुल कलामजी गावा बाहेरून जाणाऱ्या रेल्वेतून फेकले जाणारे वर्तमानपत्रांचे गठ्ठे उचलायचे. आकाशात उंच उंच उडणाऱ्या पक्षांना पाहून आपण पण कधीतरी असेच हवेत उडू असा विचार ते करायचे.

 


Adam D'Angelo आणि Charlie Cheever ह्यांनी "Quora" बनवण्यासाठी फेसबुकमधील आपल्या उच्चपदाचा जॉब सोडला होता. 



हे आहेत नवाजुद्दिन सिद्दिकी! १९९९ ला आलेला "सरफरोश" हा त्यांच्या पहिला चित्रपट होता.



ह्या व्यक्तींचे इथे फोटो दाखवण्यामागे असलेले प्रयोजन आपल्या लक्षात आले का? मी सांगतो : परत पहिल्या छायाचित्रापासून नीट निरीक्षण करून पहा : एक "सामान्य माणसाची" छबी तुम्हाला दिसेल — त्यांचे कपडे, केशरचना, आजूबाजूचा परिसर, चेहरा हे सगळे "अतिसामान्य" आहेत. हेच छायाचित्र घेऊन आपण काळप्रवास (Time Travel म्हणतात बे त्याले!!) केला आणि त्यांच्या त्यांच्या "त्या" वेळेत जाऊन मी तुम्हाला सांगितले :


१) गेट्स आणि एलन ह्यांची ही गॅरेजमध्ये सुरु झालेली कंपनी एकदिवशी जगातील सगळ्यांत मोठी कंपनी बनेल!


२) हा समोर TTE उभा आहे, दिसतोय का? हा भारतीय क्रिकेट संघाचा एक असामान्य कर्णधार, यष्टीरक्षक आणि फलंदाज बनणार आहे!


३) हा मुलगा जो वर्तमानपत्र टाकतोय तो एकेदिवशी आपल्या भारताचा राष्ट्रपती बनणार आहे!


४) हे दोन जण जे आता आपला फेसबुकमधील जॉब सोडताय ते "प्रश्न-उत्तरे" असलेले Quora बनवणार आहेत जे तब्बल जगातील २४ भाषेमध्ये उपलब्ध होणार आहे!


२) हा सरफरोश चित्रपटातला गुन्हेगार पुढे जाऊन अगणित मोठे परितोषिके जिंकणार आहे आणि संपूर्ण बॉलीवूड सृष्टी हादरवून सोडणार आहे!


तुम्ही हे सगळे ऐकले असते आणि मला म्हटले असते, "तू खोट बोलतोय! हे शक्य नाही!!" आणि माझ्या हातात आपल्या काळप्रवासाचे १० रुपये देऊन तिथून निघून गेले असता. पण वास्तविकता तुम्हाला माहित आहे, "ह्यांनी हे शक्य करून दाखवलंय!"


कोणात किती आग आहे ती अशी वरवर पाहून आपल्याला समजत नाही. आवाका म्हणजे काय हो? आपली क्षमताच ना!! आता ही क्षमता आपण राहत असतो त्या ठिकाणी काय चाललंय आणि आपल्या आत काय चाललायं त्यावरून ठरते.


नक्कीच आपण स्वप्ने आवाक्याबाहेर पाहावीत कारण तुमची सध्याची स्थिती तुम्ही भविष्यात काय करू शकतात हे नाही ठरवत. जर ठरवत असती तर वरचे लोकं ह्या यादीत नसते.


It's not where you come from, it's all about heart!. 

(ह्यामुळे फरक पडत नाही की तुम्ही कुठून आला आहात, तुमच्या हृदयात काय आहे त्यामुळे फरक पडतो!) - एरिक थोमस


फुगे उंच उंच ह्याचमुळे जातात कारण त्यांच्या "आत" वायू भरलेला असतो. तुमचा परिसर तुम्ही बदलू शकतात — तुमची क्षमता वाढवू शकतात — कौशल्य वाढवू शकतात — परिस्थिती हळू हळू वाढवू शकतात. जर तुम्ही एखाद्या गोष्टीचे वाटोळे करू शकतात, खराब करू शकतात तर तिला चांगली पण करू शकतात ना? सोचो!


शेवटी एवढच सांगेल की, स्वप्न आवाक्याबाहेरचीच पाहायची — खरतरं त्यालाच स्वप्ने म्हणतात जी "आवाक्याबाहेर असतात."


माझे सगळ्यांत आवडते वाक्य आता सांगतो जे ह्या प्रश्नाचे उत्तर चोखपणे देते परंतु ते शेवटी राखून ठेवले होते.

"Don't tell me the sky is the limit, when there are footprints on the moon!” — 

तुम्ही मला हे नका सांगू की आकाश तुझी मर्यादा आहे जर चंद्रावर माणसाच्या पाऊलखुणा आहेत तर!! - पॉल ब्रांट


जर चंद्रावर माणसाच्या पाऊलखुणा आहेत तर नक्कीच कोणीतरी ते शक्य करून दाखवले असेल न!! जर दुसरे करू शकतात तर मी का नाही करू शकत??

Comments

Post a Comment