Skip to main content

योग्य करिअर निवडा आणि आयुष्य घडवा..

 

योग्य करिअर निवडा 

आणि आयुष्य घडवा..

करिअरसारखा महत्त्वाचा निर्णय घेताना आधी आपण स्वतःला ओळखलं पाहिजेमला खरंच काय बनायचं आहेमाझी खरी आवड काय आहेया सगळ्या प्रश्नांची उजळणी आधी करायला पाहिजेजेणेकरून आपल्याला जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यावर योग्य निर्णय घेण्यासाठी मदत होईल.

सुयश खूप अस्वस्थ होतात्याला कळत नव्हतंकी कसं नि काय सांगावंतो खूप गोंधळलेला आणि तणावात आहेहे त्याच्याकडे बघून लक्षात येत होतं. ‘मॅडममला काय करावं ते कळत नाहीयेकुठलं क्षेत्र निवडावं हेच कळत नाहीयेमी विज्ञान शाखेत होतोअकरावी आणि बारावीलापण मला आता इंजिनीअरिंग नाही करायचंयमला अजिबात रस वाटत नाही इंजिनीअरिंगमध्येकाय करूखूप टेन्शन आलंय मला,’ असं सांगताना सुयशचा स्वर रडवेला झाला होता.

सुयशचे आई-बाबा तर त्याहून जास्त चिंतेमध्ये होतेसुयशची आई म्हणाली, ‘मॅडम माहीत नाहीहे याच्या डोक्यात काय नवीन आलंयनाहीच म्हणतो इंजिनीअरिंगला पुढे जायचंमार्क्स खूप चांगले असतात यालातुम्हीच सांगा ना त्यालाकी हे चुकीचं आहेआता कुठे शिफ्ट होणार विज्ञान शाखेमधूनबरंइंजिनीअरिंग नाही तर नाहीपण साधं एमएस्सी करायलाही तयार नाहीयाला विज्ञान शाखा नकोच आहेदुसरं काही करून काही फारसा पैसा नाही मिळत हल्लीनुसती चित्रकला शिकून काय विशेष होणार आहेतुम्हीच सांगा आता काही तरी समजावून...,’ सुयशची आई फार काळजीत होती.


सुयश हा एक मध्यमवर्गीय घरातला मुलगात्याला चित्रकलेची खूप आवड होती आणि चित्रकलेत तो पारंगत होतासुयशने विज्ञान शाखेत प्रवेश घेतलातेव्हा नीट विचार केला नव्हताआई-बाबांची इच्छा आणि त्याचे मित्र-मैत्रिणी सायन्सलाच जायचं म्हणत होतेत्याच्या नातेवाइकांनीसुद्धा त्याला विज्ञान शाखेला जाण्यासाठी आग्रह केला आणि सुयशलासुद्धा त्या वेळेला तसंच वाटत होतंम्हणून त्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतलापण आता त्याला हा अभ्यास जड वाटू लागलाअभ्यास करताना सगळं कठीण जात होतंआणि त्याला विज्ञान शाखेचा अभ्यास आवडतही नव्हताविज्ञान शाखेचा अभ्यास पुढे करायचा नव्हताइंजिनीअरिंगसुद्धा त्याला करिअर म्हणून करायचं नव्हतंआता त्याला काय करावं ते कळतं नव्हतंतो पूर्णपणे गोंधळात पडला होताम्हणून तो कौन्सेलिंग सेशनला आला होता.

सुयशसोबत बोलताना लक्षात आलंकी दहावीनंतर विज्ञान शाखेला प्रवेश घेताना त्याने कोणताही नीट विचारच केला नव्हतासगळे म्हणतातसध्या सगळेच विज्ञान शाखा घेतातम्हणून त्यानेसुद्धा घेतली होतीपण त्याची खरी होती आवड चित्रकला!

आवडीच्याच चित्रकलेत त्याला आता करिअर करायचं होतंपरंतु घरातल्या सगळ्यांचं असं म्हणणं होतंकी चित्रकला आवड म्हणून ठीक आहेपण त्यात करिअर नाही होऊ शकतआता बारावीनंतर काय करावंयासाठी घरच्या लोकांचं एक सांगणं होतं आणि मित्र-मैत्रिणी तर त्याला इंजिनीअरिंगच कर म्हणत होतेपण या सगळ्यामुळे तो अजूनच जास्त गोंधळात पडला होता.



खरंचआजकाल करिअर हा पैसा आणि नोकरी याचा समानार्थी शब्द झाला आहेकरिअर म्हणजे खरंच नोकरी आणि पैसा एवढंच असतं काखरं तरकरिअर म्हणजे अशी गोष्ट जी करताना समाधान असतंजे केल्याने आपल्याला आनंद मिळतो.

आजकाल करिअरपेक्षा जॉबला खूप महत्त्व दिलं जात आहे. ‘करिअर आधी महत्त्वाचं आहेत्याशिवाय काही गत्यंतर नाही,’ असे आपण सगळे म्हणत असतो आणि आपल्यालाही आयुष्यात काही तरी बनून दाखवायचं असतंस्वतःला सिद्ध करायचं असतंस्वतःला सिद्ध करण्याच्या नादात आपण कुठे तरी करिअर निवडतांना स्वतःबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करायचं विसरतोयमी खरंच कसा/कशी आहेमला खरंच काय करायचं आहेमला काय काय आवडतंमी जे काही अभ्यासक्रम निवडतोय/निवडतेय त्याबद्दल मला पूर्ण माहिती आहे कामी जे करिअर निवडते/निवडतो आहे ते माझ्यासाठी योग्य आहे की नाहीया सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप महत्त्वाचा आहेप्रत्येकाच्या आयुष्यात करिअरची निवड हा खूप महत्त्वाचा टप्पा आहेत्यामुळे या टप्प्यावर नीट विचार करून निर्णय घेणं गरजेचं आहे.

सध्या करिअरची निवड म्हटलंकी ‘कलचाचणी’ केली जातेकरिअर निवडताना “कलचाचणी” स्वतःबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या नजरेसमोर आणतेज्यामुळे आपल्याला स्वतःची काही बलस्थानं कळण्यास मदत होतेयाचसोबत करिअर निवडण्यासाठी अजून काही गोष्टींचा विचार केला गेला पाहिजेआपलं व्यक्तिमत्व कसं आहेस्वतःची आवड काय आहेआपली क्षमता कुठल्या गोष्टींमध्ये जास्त आहेया सर्व गोष्टींची माहिती असणं करिअर निवडताना आपल्याला खूप मदतीचं ठरतंम्हणून कलचाचणीसोबत या सगळ्या गोष्टींचा विचार करणं सध्याच्या काळात नक्की महत्त्वपूर्ण राहील.



उदाहरणार्थएखाद्या व्यक्तीला मुळातच कमी बोलायला आवडतं आणि अशा व्यक्तीने मार्केटिंगचा अभ्यास केलाजिथे काम करताना संभाषण कौशल्ये उत्तम लागतातते काम करायला सुरुवात केलीतर अशा व्यक्तीला ते काम करताना प्रचंड अडचण येईलअशी व्यक्ती अशी कामं यशस्वीरीत्या पार पाडू शकणार नाही आणि मग त्याच्या जीवनात संघर्ष सुरू होतोया सर्व गोष्टींचा परिणाम मग त्या व्यक्तीच्या आत्मविश्वासावर होऊ लागतोस्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होऊ लागतोकालांतराने ही व्यक्ती नैराश्याकडे वळतेस्वतःला कमी समजू लागते.

सुयश तर उदाहरण आहेअशी कित्येक मुलं-मुली आहेतजी करिअरसारखा आयुष्याचा महत्त्वाचा निर्णय घेताना गोंधळतातकरिअर आणि जॉब/पैसा यातला फरक लक्षात  घेता काम करत राहतातकसे तरी निराशेसोबत जीवन जगत रहातातत्यामुळे अर्थपूर्ण आयुष्याचा विचार होत नाही आणि कामाचं समाधान मिळत नाहीत्यामुळे त्यांच्या आयुष्याला काहीअर्थ उरत नाही. ‘बसचल रही है जिंदगी’ असं म्हणत सगळे नुसते जीवन जगत राहतात.

करिअरसारखा महत्त्वाचा निर्णय घेताना आधी आपण स्वतःला ओळखलं पाहिजेमला खरंच काय बनायचं आहेमाझी खरी आवड काय आहेया सगळ्या प्रश्नांची उजळणी आधी करायला पाहिजेजेणेकरून आपल्याला जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यावर योग्य निर्णय घेण्यासाठी मदत होईल.


ऑनलाइन वेबिनार - योग्य करिअर निवडा आणि आयुष्य घडवा! (१९९/-)

वेळ - २ तास 

संवाद साधा 9975359911
संपर्क करा 7822887227
सहकार्य मिळेल
आपली सायली सावंत

Comments