Skip to main content

भारतात फेसबुक, गुगल, युट्युब सारख्या कंपन्या का नाहीत?

 

भारतात फेसबुक, गुगल, युट्युब सारख्या कंपन्या का नाहीत?


त्यासाठी लागणारी मन:स्थिति असणारे अभियंते आणि वातावरण आपल्याकडे पुरेसे नाही.


आपण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहोत हे बर्‍याच अंशी खोटं आहे. आपल्या इथला संगणक उद्योग हा जास्त करून सर्विस प्रकारचा आहे. आपण कमी पैशात परदेशातील कंपनी चे काम करून देतो आणि त्यासाठी भारतीय कंपन्यांना कंत्राटे मिळतात.


राग येऊ देऊ नका, पण थोडक्यात, आपले संगणक अभियंते हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील माथाडी कामगार आहेत. नावीन्याचा शोध घेण्याची कुवत असूनही ते बारा पंधरा च्या पॅकेज किंवा काही वर्ष ऑन साईट वर खुश आहेत. एखाद दुसरा फ्लॅट कॅश वर घेऊन भाड्याने दिला की आयुष्याचे सार्थक होते मग कशाला डोक्याला कटकट पाहिजे?


यातील बर्‍याच जणांचा दिवस क्लायंट ने दिलेली कामे करण्यात जातो. बरेच वरिष्ठ कर्मचारी तर अक्षरशः एक्सेल शीट भरत असतात किंवा स्वतः ची नोकरी चालू ठेवण्यासाठी काहीतरी टुकार काम करत असतात. अधे मध्ये चहा ब्रेक, सुट्टा ब्रेक, स्नॅक्स ब्रेक चालू असतो. वर्ष सहज निघून जाते आणि मग पगारवाढीच्या वेळेस कुरकुर झाली की 'स्विच' मारायचा आणि नवीन कंपनीत पुन्हा तेच करत बसायचे.



आता दुसरा मुद्दा म्हणजे या क्षेत्रात जे नवीन इंजीनियर येतात त्यांचा दर्जा थोडा कमीच असतो आणि अपेक्षा मात्र प्रचंड असतात. (अपवाद आहेत) यांना खूप पैसा कमी वेळात कमवायचा असतो, पण त्यासाठी काय मेहनत करावे लागते हे ही कळत नसते. यांचे ध्येय म्हणजे निव्वळ पैसा.


तीसरी गोष्ट, सर्वात महत्त्वाची, आपल्याकडे स्टार्ट अप संस्कृती अजून तरी रुळलेली नाही. नावीन्यपूर्ण कल्पना असेल तरी 'रिस्क' घ्यायला आपण घाबरतो. मग, कुठून येणार गूगल किंवा फेसबुक?



——————


तळटीप : वातावरण थोडे का होईना पण बदलत आहे. बघूया, काही वर्षात काय होते ते!

लेखक : किरण नलावडे, कोरा

--------------------------------------------------------

e4

पोस्ट कॉर्नर महत्त्वाचे बोलू काही

या 10,000+ सदस्य असणाऱ्या व्हाॅट्सॲप ब्रॉड कास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. 
इथे उद्योग, व्यवसाय, अर्थक्रांती, पुस्तके, नवीन कोर्सेस, सक्सेस मंत्रा, फ्रिलांसिंग जॉब्स व वर्क फ्रॉम होमच्या संधी इ. विषयांवरील लेख व माहिती वाचायला मिळते!
-----------------------------------------
e4 service
E-mail : e4service4u@gmail.com
-------------------------

Comments