Skip to main content

लोकांनी तुमचा आदर करावा यासाठी काय करावे?

 




०१) कमी बोला, स्वभाव शांत ठेवा

०२) लोकांचं म्हणणं ऐकून घ्या

०३) फटकळ स्वभाव सोडा, डिप्लोमॅटिक रहा

०४) वाद, मतभेद होतील असं काही बोलू नका

०५) शिव्या देऊ नका

०६) फुकटचे सल्ले देऊ नका

०७) फुकटच्या चौकशा करू नका

०८) दुसऱ्यांवर हसू नका

०९) दुसऱ्यांना कमी लेखू नका

१०) टोमणे मारून, "मी किती भारी' असं दाखवू नका

११) बडेजावपणा किंवा बढाया मारू नका

१२) चांगले कपडे घाला

१३) गबाळेपणा टाळा

१४) डोळे स्वच्छ, तजेलदार ठेवा

१५) अंगाला, तोंडाला वास येणार नाही याची काळजी घ्या

१६) जात, धर्म यावरून कोणाला नावं ठेवू नका

१७) मोठ्याने बोलणं किंवा हसणं टाळा.

१८) कोणाचं काही अडलं असेल तर त्यांना मदत करा

१९) स्वतःच्या दुःखांचं जाहीर प्रदर्शन मांडू नका

२०) वागण्यात संयमीपणा ठेवा, आततायीपणा नको


लोकं आपल्यापेक्षा हुशार आहेत, हे लक्षात ठेवा. त्यांचा आदर करा, तुम्हाला सुद्धा ते आदराने वागवतील.



--------------------------------------------------------

Comments

Post a Comment