पुस्तके वाचून कोणी श्रीमंत होऊ शकतो का?
नक्कीच
किंबहुना आज जगातील श्रीमंत व्यक्ती आधी चांगले वाचक आहेत
पुस्तके वाचून - कल्पनाशक्ती तयार होते - कल्पनाशक्ती मुळे सर्जनशील व्यक्तिमत्त्व विकास होतो व त्यामुळे "सुशिक्षित आणि सर्जनशील समाज निर्माण होण्यास मदत होते".
१- वॉरेन बफेट : आर्थिक व्यवस्थापनाची पुस्तके वाचून जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले.
२- जेफ बेझोस : अमेझॉन ची सुरुवातच मुळी ऑनलाइन पुस्तक विक्री करण्यापासून झाली.
जेफ यांनी ऑनलाइन शॉपिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरवातीला पाच गोष्टी सॉर्ट केल्या आणि त्यापैकी एका गोष्टींपासून सुरुवात करावयाची असे ठरवले आणि त्यांनी पुस्तक निवडले!
३- जे के रोलिंग : हॅरी पॉटर या गाजलेल्या पुस्तक मालिकेच्या लेखिका.
पुस्तके लिहून कोणी लखपती नाही तर करोडपती होऊ शकते हे त्यांचे यश दाखवते.
४- जॅक मा : पुस्तके वाचण्याला महत्व देतो कारण पुस्तके वाचूनच आपण चांगल्या प्रकारे इंग्रजी शिकू शकलो असे तो मान्य करतो.
(पोस्ट कॉर्नर +)
(महत्त्वाचे बोलू काही
Comments
Post a Comment