मित्रांनो या लेखामध्ये मी तुम्हाला ज्या व्यवसायाबद्दल सांगणार आहे त्या व्यवसायासाठी तुम्हाला खूप खर्च किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही, याला जागेची सुद्धा गरज नाही. अगदी कमी खर्चात किंवा शून्य खर्चात तुम्ही कुठेही केव्हाही घरी बसून हा व्यवसाय करू शकता. यामध्ये तुम्हाला खूप फायदा व नफा मिळू शकतो. हा व्यवसाय म्हणजे रेफरल बिजनेस. होय, प्रत्येक जण हा व्यवसाय करू शकतो. व्यावसायिकाला आणि ग्राहकाला मधी जोडून तुम्ही कमी वेळात जास्तीत जास्त पैसा कमवू शकता.
फक्त यासाठी काही गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात. एक गोष्ट तुम्हाला माहित असेल की शेअर मार्केट मध्ये ब्रोकर असतात आणि ते ब्रोकर क्लाइंट कडून काही कमिशन घेतात. बरोबर...
पण मला तुम्हाला शेअर मार्केट बद्दल सांगायचं नाही, तर तुम्ही इतर अनेक व्यवसायांसाठी रेफरन्स देण्याचं काम करू शकता, यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यायची गरज पडणार नाही. अनेक व्यवसायांना तुम्ही कस्टमर देऊ शकता किंवा ज्या कस्टमरला एखाद्या वस्तूची, सेवेची गरज असेल तर त्यांनाही तुम्ही व्यवसायिकांचा रेफरन्स देऊ शकता.
आता तुम्हाला असा विचार करायचा आहे की मी कोणत्या व्यवसायाला कस्टमर देऊ शकतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, समजा मी असा विचार करेल की गावांमध्ये हापूस आंब्याची शेती करणारे शेतकरी आहेत. ते शेतकरी त्यांचा माल विकत असतात. मग मी काही शहरांमधील आंबे विक्रेत्यांशी संपर्क करेल. त्यांच्याशी बोलून त्यांना कमी किमतीमध्ये हापूस आंबे मिळतील असे सांगेल. आणि गावातील शेतकऱ्यांना सुद्धा त्यांना परवडेल अशा किमतीत होलसेल मध्ये ते आंबे विकत घेतल्या जाईल, असे सांगेन. त्यांना त्या आंबे विक्रेत्यांचा कॉन्टॅक्ट करून देईल. यामुळे मी दोघांकडूनही 10 टक्के 20 टक्के असे काही कमिशन घेईन. आणि मी आता त्यांच्यासोबत मोबाईल वरूनच संपर्क करेल. यामुळे अजून माझं काम सोपे होईल.
दुसरे उदाहरण बघा, एक माझा मित्र आहे. तो कम्प्युटर्स बनवून देतो. त्यामध्ये काही सुधारणा करून देतो. त्याने मला सांगितले होते की ज्याला कोणाला कम्प्युटर पाहिजे किंवा कंप्यूटर मधील काही तांत्रिक बिघाड दुरुस्त करून पाहिजे अशा लोकांचा रेफरन्स मला दे. मी तुला एक-दोन हजार रुपये देईल. मी कॉलेजमध्ये असताना त्याला महिन्यातून तीन-चार तरी कस्टमर द्यायचो. त्यामुळे मला 4/5 हजार रुपये मिळायचे.
मित्रांनो, आयडियाज भरपूर आहेत.. फक्त तुम्हाला विचार करायची गरज आहे की मी कोणता रेफरल बिजनेस करू शकतो. काही पैसे खर्च करून शिकायची पण तयारी ठेवा. कोणत्या बिजनेसला मी कस्टमर देऊ शकतो. अनेक असे पर्याय तुम्हाला समोर दिसू लागतील. जसे की प्लॉटिंग विकणे, फ्लॅट विकणे, रेंट वरती दुकाने देणे, होलसेल मध्ये मालांचा सप्लाय करणे, स्टुडंट्स रेफरन्स देणे, अशा अनेक संधी सापडतील.
आता यामध्ये काही गोष्टी तुम्हाला क्लिअर कराव्या लागतील, जसे की ज्या कस्टमरला आपण एखाद्या व्यवसायाबद्दल जर रेफरन्स देत असेल तर तो व्यवसाय खरच प्रामाणिक आहे का, त्याचे प्रोडक्स किंवा सर्विस चांगली आहे का, कस्टमरला खरंच फायदा होणार आहे का, अशा अनेक गोष्टी असू शकतात, त्या तुम्ही चेक करायला पाहिजे.
मग मात्र तुम्ही त्यांच्यासाठी काम करू शकता आणि तुमचा स्वतःचा इन्कम तुम्ही तयार करू शकता. मला तुमच्या रेफरल बिजनेस बद्दल ऐकायला आवडेल. तुम्ही मला व्हाट्सअप वर मेसेज करू शकता.
मित्रांनो, तुम्हीसुद्धा आमच्या कस्टमरला आम्ही ज्या काही ऑनलाइन सर्विसेस देतो, तर त्या सर्विसेसला तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांना किंवा सोशल मीडियाचा उपयोग करून अनेक लोकांना रेफर करू शकता. आम्ही तुम्हाला 10 ते 50 टक्के इन्सेंटिव्ह देऊ. यामध्ये तुम्ही आमच्या प्रत्येक सर्विसेसची खात्री करून घेऊ शकता. आपण इच्छुक असल्यास आमच्या व्हाट्सअप एडमिनला मेसेज करू शकता.
Our e4 Online Services And Job Opportunities For You
---------------------------------------------
(पोस्ट कॉर्नर +)
(महत्त्वाचे बोलू काही
Comments
Post a Comment