Skip to main content

स्टार्टअप करण्यासाठी सोपे उपाय


आजकाल स्टार्टअप हा शब्द खूपदा कानावर पडत आहे. स्टार्टअप तसा इंग्रजी शब्द आहे, पण आपल्याकडे सर्रास वापरला जातो. अगोदर स्टार्टअपची ओळख पिन किंवा प्लग अर्थात काही तरी तांत्रिक गोष्ट म्हणून होती. पण आज २०१६ मध्ये त्याला एक वेगळी आणि स्पष्ट ओळख मिळालेली आहे. आता स्टार्टअप म्हणजे छोटेखानी व्यवसाय.> असा व्यवसाय तुम्ही स्वत:ही सुरु करू शकता किंवा एखादा चालू व्यवसाय विकत घेऊ शकता. चालू व्यवसाय विकत घ्यायचा म्हणजे जास्त भांडवल. पण जर स्वत: हा सुरु करायचा तर या चार गोष्टींचा अभ्यास गरजेचे आहे. उत्तम कल्पना, चांगली माणसे जोडा, ग्राहकांना काय पाहिजे ते नीट ओळखा आणि कमीतकमी भांडवल. चला या गोष्टी जाणून घेऊया.


एक कल्पना :-

खरतर एक चांगला किंवा यशस्वी व्यवसाय करायला काही नवीन अथवा वेगळं करायची गरज भासत नाही. गरज आहे वास्तविक गोष्टी अधिक उत्कृष्ठ आणि सोप्या करायची. गोष्ट जेवढी सोपी आणि सहज तेवढी त्याची मागणी व खप अधिक. जमाना फटाफट आणि फास्ट गोष्टींचा आहे. वास्तविक गोष्टी, वस्तू, पदार्थ किंवा तंत्रज्ञानात माफक व फायदेशीर बदल केला तर अशा गोष्टी लोकांना आवडतात. त्याचाच चांगला परिणाम तुमच्या व्यवसायावर होतो. मागणी वाढते आणि त्यामुळे खप वाढायला लागतो. दैनंदिन जीवनातील गोष्टींकडे बारकाईने लक्ष्य दिले व त्यातील त्रुटी समजून घेतल्या तर आपल्याला आपली स्टार्टअप आयडिया मिळालीच म्हणून समजा. योग्य व्यक्ती चांगली किंवा योग्य व्यक्ती यावरून आम्ही अचूक उमेदवार कसा निवडाल यावर भर देत आहोत. आपल्या स्टार्टअपसाठी कोणती व्यक्ती कुठल्या पदासाठी योग्य आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. कोणीतरी असे जो आपले काम थोडे अधिक गंभीररित्या करेल व व्यावसायिक पद्धतीने पूर्णत्वास नेईल. आपल्या कामाला हवी असलेली पूर्ण योग्यता आणि तांत्रिक ज्ञान त्या उमेदवाराला असणे गरजेचे आहे. तसेच जी गोष्ट त्याला येत नाही त्याची कबुली त्याने प्रामाणिकपणे देणे गरजेचे आहे. अशी व्यक्ती नवीन काम मन लावून करते आणि उत्तम रिजल्ट देते. असे लोक स्वतःच्या आणि उद्योगाची प्रगतीचीचे शिल्पकार ठरतात.


ग्राहकांची आवड :-

कुठल्याही व्यवसायात ग्राहक हाच राजा असतो. ग्राहक पसंती मिळावी म्हणून कंपन्या, उद्योजक आणि फेरीवाले सुद्धा वेगवेगळी शक्कल लढवत असतात. आकर्षक जाहिरात, सुंदर पॅकिंग, सोबत वस्तू मोफत किंवा सवलत असे पर्याय वापरले जातात. तरीही कंपनीचा माल आणि त्याची शुद्धताच ग्राहकांना आकर्षित करते. उदाहरणार्थ, एखादे हॉटेल जे दिसायला अगदी साधे आहे, छोट्या स्वरूपाचे व तिथे वर्षानुवर्षे तेच पदार्थ मिळतात. पण तरीही त्याला अधिक अथवा भरपूर ग्राहक पसंती मिळते, असे का? कारण तेथील पदार्थाचा दर्जा कायम जोपासला गेला आहे. पदार्थाची चव, स्वरूप आणि गुणवत्ताही राखलेली असते, जी भरघोस प्रतिसाद मिळवत असते. आपण असच काही केलं तर आपला व्यवसाय यशस्वी होईल. भांडवल असं म्हणतात की सगळ्याच सोंग आणता येते पण पैशाचे नाही. कुठल्याही व्यवसायात पैसे लावणे आवश्यक आहे. भांडवलाशिवाय काहीच शक्य नाही. ते कसे आणि कुठून उभे करायचे हा सखोल विचार करणे गरजेचे आहे. सरकारी योजना, छोटेखानी अथवा लघु उद्योग योजना आणि नवीन आलेल्या स्टार्टअप पॉलिसी या सर्वांचा सखोल अभ्यास आवश्यक आहे. कर्ज घेण्याचा विचार असेल तर ते कितीही व कुठून घेण्याचे याचा निर्णय करणे अनिवार्य आहे. स्वतःचे पैसे लावण्याचा विचार असेल तर ते कितीही आणि कसे लावायचे हे तपासले गेले पाहिजे. आपल्या व्यवसायात गुंतवणूकदार आणायचे कि नाही हे सुद्धा ठरवले गेले पाहिजे. त्यांची टक्केवारी अधोरेखित करायला हवी. तुम्ही बनवलेल्या मालातून तुम्हाला लगेचच उत्पन्न मिळणे आवश्यक आहे. मिळालेल्या उत्पनातून अजून माल अथवा उत्पादन करून विकायचे आहे. पैशाची अशी ये-जा तुम्हाला यश प्राप्त करून देईल. उत्पादन करत असताना किंवा त्याच्याही अगोदर खप करण्याची योजना आखली गेली पाहिजे. अशाने पूर्ण वेळ खपाकडे केंद्रित करता येईल. अशारितीने आपण आपले स्वप्न सत्यात उतरवू शकता. सखोल अभ्यास, वेळेचे नियोजन, भांडवलाची उत्तम आखणी आणि भरपूर मेहनतीद्वारे तुम्ही तुमचा व्यवसाय किंवा स्टार्टअप करू शकता.


लेखक - सुजाता नायकुडे

----------------------------------------------

(पोस्ट कॉर्नर +)

(महत्त्वाचे बोलू काही

या 20,000+ सदस्य असणाऱ्या व्हाॅट्सॲप ब्रॉड कास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. 
इथे उद्योग, व्यवसाय, अर्थक्रांती, पुस्तके, नवीन कोर्सेस, सक्सेस मंत्रा, फ्रिलांसिंग जॉब्स व वर्क फ्रॉम होमच्या संधी इ. विषयांवरील लेख व माहिती वाचायला मिळते!

e4 service
E-mail : e4service4u@gmail.com
8007219237
----------------------------------------------------
Copyright © e4 service

Comments