Skip to main content

मनाने आणि पैशानेही श्रीमंत व्हा

 


आपल्या मायबोली मराठी भाषेत एक चांगलीच म्हण प्रचलित आहे, ती म्हणजे 

माणूस पैशाने नाहीतर मनाने श्रीमंत असला पाहिजे!
हो, बरोबर आहे!
परंतू ही म्हण आज पुरेशी तितकी आजच्या परिस्थितीत आपल्याला लागू होणार नाही, हे माझं वैयक्तिक मत.
मी याला थोडंसं बदलून असं म्हणेन की
प्रत्येक माणूस मनानेच नाहीतर पैशाने सुद्धा श्रीमंत असला पाहिजे.

माझ मत बरोबर आहे की नाही?
व्हॉट्सॲप वर तुमचे मत काय आहे, कृपया कळवा!

(WhatsApp Me)


पहिलं वाक्य आपल्यामध्ये गरिबी आणि श्रीमंती असा भेदभाव निर्माण करतेय असे वाटते
आणि दुसरे वाक्य आपल्याला समानतेची भावना दर्शवते.

पैसा
पैशाने सुख, समाधान, आनंद, माणुसकी विकत घेता येत नाही, कदाचित बरोबर असेल किंवा नसेल.
परंतू जेव्हा घरात कोणी आजारी पडतं, ईमर्जंन्सी येते अशा वेळी जबाबदारी असणाऱ्या व्यक्ती जवळ पुरेसे पैशे नसेल तर स्वत:वर काय काय अडचणी किंवा बिकट परिस्थिती येतात हे, त्याला चांगलच माहित असेल.
पैसा असेल तर त्या आजारी माणसाचा जीव वाचतो, हेही मात्र एक सत्यच आहे!
त्यामुळे पैसा कधीच वाईट नसतो, त्याला तर गरिब-श्रीमंत काहीच माहीत नाही.

तर मनाने श्रीमंत असायलाच पाहिजे, यात काही शंका नाही. पण पैशाने सुद्धा तितकेच श्रीमंत असले पाहिजे. निदान आपलं कोणी जिवलग, घरातील आई-वडील, भाऊ-बहिण, मुलं-मुली एखाद्या वेळी यांना काही अडचण आली तर तिथं पैशाचं काम पडू शकतं. ती समस्या पैशाने सोडवली जाऊ शकती.

छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा माहित होतं की जर आपल्याला एक मोठं साम्राज्य उभं करायचं असेल तर आपल्याला संपत्ती निर्माण करावी लागेल.
सर्व सैनिक व त्यांची कुटुंबे या सर्वांची खाण्याची, राहण्याची सोय, त्यांची हत्यारे व त्यांचा पगार ई‌ गोष्टींसाठी पैसा म्हणजे संपत्ती पाहिजे होतीच ना.
विचार करा की जर महाराजांनी संपत्ती मिळवली नसती तर एवढं मोठ्ठं मराठा साम्राज्य उभं राहिलं असतं का?

म्हणून पैसा हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहेच. त्याच्याबद्दल आपण नेहमी सकारात्मक विचार करायला हवेत. हळूहळू आपली संपत्ती वाढवायला हवी.
आणि संपत्ती ही ज्ञानाने मिळवली जाते. कितीही तुम्ही विचार केला तरीही तुमची संपत्ती वाढणार नाही.
आपल्याला जेवढे ज्ञान आहे तेवढीच संपत्ती आपल्याकडे असते.
त्यामुळे शिका आणि कमवा हाच मार्ग वापरून आपण पैसे, संपत्ती कमवू शकतो.

Learn Before Earn

म्हणून आज प्रत्येकाने आर्थिक स्वावलंबी होणे गरजेचे आहे. 
------------------------------------
e4 service
Encourage | Educate | Empower | Employ


---------------------------------

(पोस्ट कॉर्नर +)

(महत्त्वाचे बोलू काही

या 20,000 + सदस्य असणाऱ्या व्हाॅट्सॲप ब्रॉड कास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. 
इथे उद्योग, व्यवसाय, अर्थक्रांती, पुस्तके, नवीन कोर्सेस, सक्सेस मंत्रा, फ्रिलांसिंग जॉब्स व वर्क फ्रॉम होमच्या संधी, इ. विषयांवरील लेख व माहिती वाचायला मिळेल!

Join | Learn | Share | Earn
------------------------------------
e4 team

पोस्ट उपयोगी आणि आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा

Comments