Skip to main content

तुरटी जवळ ठेवा!





माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला. 
ती सांगत होती, 
"आत्ताच तासभर योगासन करून आले आणि तुला फोन केला."
फोनवर ती बरेच काही बोलत होती. बोलता बोलता ती म्हणाली, 
"पंधरा-वीस वर्षांपूर्वी एक मैत्रीण मला वाकडं बोलली ते अजून मनातून जात नाही."
मला हसूच आलं.
आपले शरीर निरोगी रहावे म्हणून शरीराची काळजी घेणारा माणूस पंधरा-वीस वर्षांची जळमटे मनात शाबूत ठेवतो. 
हा गलथानपणा बरेचजण वेळोवेळी करत असतात.
खरंतर आपल्या लक्षात ठेवण्यासारख्या कितीतरी गोष्टी असतात 
पण आपण आपल्या मेंदूत वाईट गोष्टींचा भरणा भरपूर करत असतो.
कधी कधी माणसं मनात नसतानाही सहज काही बोलून जातात. 
आपल्या मनाला ते लागतं. 
आपण वेळीच ते झटकून टाकत नाही. 
अंगावर झुरळ आलं की आपण ते लगेच झटकून टाकतो. 
आपल्याला झुरळाची किळस वाटते.
तसंच, 
आपल्याबाबत कुणी किळस वाटणारे शब्द वापरले तर तेही झुरळासारखे झटकून टाकता आले पाहिजेत. 
आपला मेंदू म्हणजे काही गोडाऊन नाही की वाटेल त्या गोष्टी आपण साठवून ठेवाव्यात...
जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आपला मेंदू आहे. 
आपलं लहानपण, 
आपलं तरुणपण, 
त्यात घडलेल्या चांगल्या गोष्टी मेंदू जपतो. 
वेळोवेळी आपल्याला तो स्मरण करून देतो. 
आपण त्या स्मरणरंजनात रमून जातो. 
कधी आपल्या डोळ्यात पाणी येतं तर कधी ओठांवर हसू.
जगताना आपल्याला एवढा चांगला आधार देणारा मेंदू 
आपण नाही त्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवतो. 
आपण आपल्या मेंदूवर सतत अन्याय करतो.
मेंदूला वाचा नसते. 
तो मुका असतो. 
त्याला काही कळत नाही.
पण हृदयाला मन असते. 
त्याला तरी ते कळले पाहिजे.
काही माणसं स्पर्धेसाठी आपल्याशी शत्रुत्व घेतात ती गोष्ट वेगळी. अशावेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लढले पाहिजे.
पण ९०-९५ टक्के गोष्टी अशा असतात, की त्या आपल्या आयुष्यात फारशा गंभीर नसतात. 
त्या वेळीच सोडता आल्या पाहिजेत.
मेंदू सृजनशील आहे. 
त्यातच त्याला गुंतवून ठेवले पाहिजे.
ज्या गोष्टी सृजनशील गोष्टींशी निगडीत नाहीत त्यांना वर्तुळाबाहेर ठेवले पाहिजे.
आपलं मन आनंदी असणं, 
आपलं घर, 
आपले जवळचे मित्र आनंदी असणं, हेच तर आयुष्य आहे. 
या पलीकडे काय असू शकते?
लहानपणी माझी आई सांगायची, पाणी गढूळ झाले की त्या तुरटी फिरवावी. गाळ खाली बसतो. स्वच्छ पाणी मिळते.
मन गढूळ करणारे अनेक प्रसंग आयुष्यात येतात.
अशावेळी त्या मनाच्या गढूळ पाण्यात तुरटी फिरवता आली पाहिजे.

डॉ सचिन मोरे 
होमिओपॅथी तज्ञ.
M.D Homeopathy.
Canada Corner, Nasik
drmoresachin@gmail.com.
होमिओपॅथी एक सर्वांगीण उपचार.

(e4 उद्योजक टीम!)

Start Career In Freelacing Field

Need

Whatsapp Group Admin

Online Book Seller

Online Spoken English Teacher

Marketing Executive

E4 Team Member

-----------------------------------------

e4 service 

e-learning and earning platform for all

Click Now


WhatsApp Broadcasting Network

(e4 पोस्ट कॉर्नर +)™

इथे उद्योग, व्यवसाय, करीअर, व्यक्तिमत्व विकास, सक्सेस मंत्रा, वाचनीय पुस्तके, इंग्रजी, फ्रिलांसिंग जॉब्स इत्यादी विषयांवरील 

अनेक लेख वाचायला मिळतात. 

Click Now


Follow Us On Facebook

Follow Now


Follow Us On Instagram

Follow Now

तुमचे प्रश्न, अडचणी, शंका विचारण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी आमच्या टीम मेंबरला व्हॉट्सॲप मेसेज किंवा कॉल करा

Chat Now


Customer Call Center Number

(24/7 Whatsapp And Calling Support)

Copy the Number And Call Now

+91-913-007-3071

e4 service, Maharashtra, India - 431114

 E-mail : e4service4u@gmail.com


Copyright 2020 © e4 service (All Rights Are Reserved)

Comments