Skip to main content

विचार आणि कृती यात खूप मोठा फरक आहे!


विचार आणि कृती यात खूप मोठा फरक आहे!

विचार येतात आणि जातात! 

तु आज काय केलं... तर विचार केला! कशाचा... तर उद्या सुरू करणार..! कशाला... ॲक्शन घ्यायला! कशासाठी पण ... माझं आसं - आसं स्वप्न आहे ते पुर्ण करण्यासाठी...!

आतापर्यंत काय केलं... तर विचार..! कशाचा.. सुरू करायचा! काय पण.... तर ॲक्शन कधी करायची आणि कशी करायची!
बर!!!
पुन्हा उद्या आला की झाले विचार सुरू...

काही दिवसांनंतर..  अरे झालं का सुरू???  नाही ना. आता काय झालं... भीती वाटतेय. कशाची.. फेल झालो तर लोकं काय म्हणतील..!
अरे घाबरु नकोस... लोकं नावं ठेवतच असतात आणि जे नावं ठेवतात त्यांना दुसरं काही कामच नसतं. तु सुरू त कर!
अरे हो, पण पैसे कुठून आणू, पैशांची अडचण येत आहे! तुझं नेमकं स्वप्न काय आहे? सरळ सांगू का.. मला ना कमीत कमी ५० हजार रुपये महीण्याला आले पाहिजे, पण काही सुचतच नाहीय. अरे वां, छान! प्रयत्न चालू ठेव! प्रयत्नच चालू आहे ना. अरे याला प्रयत्न नाही म्हणत. हे नुसते तुझे विचार झाले. आज आणि आत्ताच एक छोटीशी केलेली ॲक्शनच तुला उद्या यश मिळवण्यासाठी मदत करेल.

तर मित्रांनो, बोलण्यासारखे खूप आहे.
असे अनेक विचार येतात आणि जातात, नाही का!

आधी विचार करतो, प्लॅन बनवतो, अजून चांगला विचार करतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत असाच विचार चालू असतो आणि मग नंतर उद्या काम चालू करू प्रत्यक्ष, असे म्हणतो! कधी कधी तर पुढच्या आठवड्यात किंवा महिन्यात करायचं ठरवतो आणि काहीजण तर योग्य वेळेची वाटच पाहून असतात. मुहूर्त मात्र काही सापडत नाही.
असेच आपल्या सोबतही घडत असेल कदाचित! तर मित्रांनो वेळ कुणासाठी ही थांबत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून जे काय करायचंय ते आत्ताच. बरोबर ना! मग नुसता विचारच करून काही होणार आहे का? काहीतरी कृती करायलाच पाहिजे ना! मला असे नाही म्हणायचं की विचार करू नका. विचार तर करावाच लागतो, पण त्यासोबत काही कृती पण व्हायलाच पाहिजे, नाही का?

बघा, जर तुम्हाला पोहणे शिकायचं असेल तर तुम्ही विहीरीच्या किंवा तळ्याच्या काठावर कितीही बसून दुसरे कशे पोहत आहे तेच पाहत राहिले तर पोहणे शिकता येणार आहे का? काय करावं लागेल? पाण्यात उडी मारावीच लागेल ना. हातपाय हालवून पाहावेच लागेल. 

तर तसंच आहे आयुष्यात, आपलं स्वप्न किंवा ध्येय पूर्ण करायचं असेल, गाठायचं असेल तर ॲक्शन करायला सुरुवात करावी लागेल. दिवसातून जास्तीत जास्त कृती करण्यावर भर द्यावा म्हणजे दिवसेंदिवस आपण हळूहळू त्या क्षेत्रामध्ये परिपक्व बनायला लागतो.

त्यासाठी उद्या काय करायचे म्हणून आज रात्री झोपण्याआधी चांगला विचार करून उद्याचा ॲक्शन प्लॅन तयार करावा. त्यानुसार कृती करावी. हार मानू नये, कामामध्ये सातत्य ठेवावे. 

तर योग्य वेळ कधीच येत नाही. म्हणून चांगल्या वेळेची वाट पाहत बसू नका. आज जे काही तुमच्याकडे रिसोर्सेस आहे आणि मुख्य म्हणजे वेळ आहे. तुम्ही जे काही पण ठरवलं ते करण्यासाठीची योग्य वेळ ही आत्ताच असते. 

म्हणून जे काहीही करायचंय ते आत्ताच!

(पोस्ट कॉर्नर+)™ (महत्त्वाचे बोलू काही)

या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपमध्ये 

आपलं स्वागत आहे. 
इथे तुम्हाला विविध महत्त्वपूर्ण पुस्तकांचे रिव्ह्यू दिले जातात. यामध्ये  उद्योग, व्यवसाय, रोजगार, अर्थक्रांती, आयुष्य, शिक्षण, इंग्रजी, वाचण्यासाठी पुस्तके, प्रेरणादायी धडे, सक्सेस मंत्रा, यशस्वी कथा, भविष्यातील संधी, इ. अनेक महत्त्वाच्या विषयांवरील लेख आणि माहिती वाचायला मिळेल!

तसेच
पार्ट टाईम फ्रिलांसिंग जॉब्स आणि व्यवसाय या संदर्भात नव-नवीन कल्पना व वर्क फ्रॉम होमच्या संधी यांची माहिती मिळेल!

E4 Team

Start Your
Freelacing Career with E4 Team

Online Book Seller

Online Spoken English Teacher

Marketing Executive

E4 Team Member

Website & App Developer

Content Writer

----------------------------------------------

(पोस्ट कॉर्नर +)

(महत्त्वाचे बोलू काही

इथे उद्योग, व्यवसाय, अर्थक्रांती, पुस्तके, नवीन कोर्सेस, सक्सेस मंत्रा, फ्रिलांसिंग जॉब्स व वर्क फ्रॉम होमच्या संधी इ. विषयांवरील लेख व माहिती वाचायला मिळते!

e4 service
E-mail : e4service4u@gmail.com
8007219237

Our e4 Online Services For You
----------------------------------------------------
Copyright © e4 services


Comments