चिंतेमुळे कार्यकुशलतेवर अंकुश लावला जातो.
एकाग्रतेमधूनच कार्यकुशलता येते आणि एकाग्रता मन चिंतामुक्त असतानाच शक्य असते.
भय आणि चिंतेच्या भावना आपल्या अचेतन मनाला आपली इच्छापूर्ती करण्यापासून रोखून धरतात.
भीतीमुळे आपले संकट निवारण शक्ती नष्ट होते.
भय मनाच्या नैसर्गिक मनन आणि चिंतन प्रक्रियेला निष्क्रिय करून टाकते आणि त्याचे सामर्थ्य कमी करून टाकते.
श्रेष्ठ काम म्हणजे संतुलित काम आणि संतुलित कामासाठी शरीर आणि मन संतुलित असणे अनिवार्य आहे.
चिंता करण्याच्या सवयीचेच दुसरे नाव आहे - विश्वासाचा अभाव.
चिंता ही आणखी जास्त निर्माण होणाऱ्या चिंतेचीच जननी आहे.
चिंता आणि भयाचे ब्रेक्स आपल्या प्रगतीच्या रथाचा मार्ग अडवत आहेत, हे आपण पाहिल्यानंतर ते दूर फेकून द्यायला हवीत.
ही पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा.
धन्यवाद!---------------------------------
e4
पोस्ट कॉर्नर महत्त्वाचे बोलू काही
Comments
Post a Comment