शीर्षक वाचल्यानंतर थोडं वेगळं वाटेल परंतु हेच खरं आहे की जर तुम्हाला काम करायचेच असेल तर शिकण्यासाठी काम करा, पैशासाठी काम करू नका. हे मी नाही तर 'रिच डॅड पुअर डॅड' या जगविख्यात पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचे आहे.
या पुस्तकामध्ये त्यांनी या शीर्षकावर एक सविस्तर टॉपिक दिलेला आहे. त्यांच्या मते सर्व जण पैशांच्या मागे धावत आहेत. आपल्यापैकी असे अनेक जण आहेत की पगार कमी पडतो म्हणून Over Time काम करून अधिक पैसा कमावतात. तसेच असे काही लोक आहेत की त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही, म्हणजेच पैसा मिळत नाही.
खरं तर मित्रांनो यामध्ये आपलीच चूक असते की आपण पैसे कमवण्यासाठी फक्त एकच कौशल्य वापरतो ते म्हणजे… कष्ट करत राहणे, कष्टाला पर्याय नाही. हो, बरोबर आहे की काम केलं की यश मिळतं. पण इथे आपण एक गोष्ट विसरून जातो…. ते म्हणजे शिकणं!
लेखकाचं असं मत आहे की सध्या तुम्हाला पगार कमी मिळाला तरी चालेल, परंतु तुम्ही जे काही काम करत आहात, ड्युटी करत आहात त्याच्यातून तुम्हाला काही ना काही तरी फायद्याचे शिकता आले पाहिजे जे तुम्हाला भविष्यात कामात येईल.
समजून सांगण्यासाठी लेखकाने एक उदाहरण दिलं आहे. ते म्हणतात, "मी इंटरव्यू देत असताना माझी एका पत्रकारितेशी ओळख झाली. चर्चा झाल्यानंतर लेखकाला कळाले की ती महिला एक चांगली लेखिका आहे, तिच्या लिखाणाला एक शैली आहे." रॉबर्ट यांनी स्वतः या लेखिकेचे काही लेख वाचले होते. त्यांची लेखकावर छाप पडलेली होती. नंतर ती पत्रकारिता रॉबर्ट यांना म्हणाली, "मला तुमच्यासारखे बेस्ट सेलर ऑथर बनायचे आहे, माझं पुस्तक लिहून मार्केटमध्ये विकायचे आहे."
रॉबर्ट म्हणाले, "नक्की होशील, मग अडचण तरी काय आहे?"
"माझं लिखाण कोणीही छापण्यासाठी घेत नाही", ती हळुवार पणे सांगू लागली, "प्रत्येक जण म्हणतो की माझ्या कादंबऱ्या अव्वल दर्जाच्या आहेत; पण पुढे काहीच घडत नाही. मग लेखक रॉबर्ट तिला म्हणतात की तू विक्रीकला शिकायला पाहिजे. हे ऐकल्यानंतर त्या पत्रकारितेला राग आला. ती म्हणाली की माझा दर्जा (Status) आणि पेशा (Profession) वेगळा आहे. हे पाहा, मी इंग्लिश साहित्यामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे, ती काय विक्रेता होण्यासाठी? मी आता ते शिकायला जाऊ का?
मी एक व्यवसायिक आहे आणि मला ज्याची आवड आहे त्याविषयी मी शिकले आहे आणि शिकत आहे. मला काही विक्रेता व्हायचं नाही. मी अशा लोकांचा तिरस्कारच करते.
यातून आपल्याला असे दिसून येते की लेखिका काही नवीन गोष्टी शिकायलाच तयार नाही. तीची तशी मानसिकताच नाही. तिच्याकडे लेखन कौशल्य आहे परंतु दुसरे महत्त्वाचे कौशल्य नाही ते म्हणजे विक्री कौशल्य. आता या सर्व प्रसंगावरून लेखकाला हेच सांगायचे आहे की ती महिला पैशासाठी काम करत आहे… लिखाणाचं! परंतु नवीन कौशल्य शिकण्यासाठी काम करायला तयार नाही. बघा किती वेगळी मानसिकता आहे. अशा प्रकारचे अनेक लोक आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतील.
म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर सक्सेस मिळवायचं असेल तर कोणतेही काम शिकून घ्या, पैसे कमावण्याआधी त्या कामातून काहीतरी शिकायला मिळेल का याचा विचार करा.
धन्यवाद!
e4
पोस्ट कॉर्नर महत्त्वाचे बोलू काही
Comments
Post a Comment