कोणता व्यवसाय सुरु करावा?
By e4 service | Bharat Patil
अनेकजण ह्या प्रश्नाच उत्तर शोधताना दिसतात. प्रश्न लहान आहे, पण उत्तर नाही. ह्या प्रश्नाच उत्तर तुमच जीवन बदलू शकतं आणि हे जगही.
बदल
मागील १० वर्षात कोणते व्यवसाय जन्माला आले? आणि कोणते नाहीसे झाले?
कॉइन बॉक्स आठवतात का? काही वर्षापुर्वी जागोजागी दिसणारे कॉइन बॉक्स आता कुठे आहेत? सर्वांच्या घरी दिसणारे Kodak कॅमेरा कुठे आहेत? Cassettes, Radio कुठे आहेत? जर तुम्हाला कोणी १० वर्षा आधी सल्ला दिला असता, ह्या व्यवसायांपैकी एक व्यवसाय करा तर काय झाले असते?
१० वर्षात काही नवीन व्यवसायही जन्माला आलेत म्हणा. ऑनलाइन विक्री, मोबाईल रिचार्ज – रिपेअर सेंटर, Mobile चा विमा पण आलाय. आधी लोकांना दूरदर्शन पाहून मजा यायची, पण आज हजारो टीव्ही चॅनेल्स कमी पडून लोकांना Youtube पाहिजे आहे. आणि आता त्याहीपुढे लोकांना नेटफ्लिक्स हवंय.
मागील १० वर्षात काही व्यवसाय जन्माला आले तर काही मरण पावले. मग मी कोणता व्यवसाय करावा?
तुम्हाला एक गोष्ट दिसून येईल कि जग बदलत आहे, आणि ते आता फार वेगाने बदलत आहे. तुम्ही कल्पना केली कि माझा फोन पाण्यात पण चालावा आणि काही वर्षात तसे फोनही आले. तुम्ही कल्पना केली की घर बसल्या मला खरेदी करता यावी आणि आता तुम्ही तसे करतही आहात. घरबसल्या आपल्या नातेवाईकांना आपण पैसे पाठवू शकतो. आता तर नवीन 3d प्रिंटर येत आहेत. आपण घरी बसल्या अनेक वस्तू आता प्रिंट करू शकतो.
हे सर्व सांगण्याचा उद्देश काय? तर मी कोणता व्यवसाय करावा? हा प्रश्न आजच्या जगात योग्य प्रश्न नाही. कारण कोणता व्यवसाय किती दिवस टिकेल हे आजच्या जगात सांगता येत नाही.
बरोबर प्रश्न कोणता?
मी या जगाला काय देऊ शकतो? मी हे जग आणखी चांगले कसे करू शकतो? माझ्यात असे कोणते गुण / कला आहेत? ज्यांच्या मदतीने मी हे करू शकतो ?
ह्या जगात चांगले काम करायला आपल्याला फक्त समाजकार्य करावे लागेल असे नाही.
Jack Ma यांनी चीन मध्ये Alibaba.com ही वेबसाईट सुरु केली, यामुळे अनेक छोटे व्यवसाय एकमेकांशी जोडले गेले. त्यामुळे छोटे व्यावसायिकांना फायदा झाला आणि अर्थातच त्याचा फायदा सामान्य व्यक्तीलाही झाला.
Steve Jobs यांनी Apple कंपनी सुरु केली. Apple मुळेच फोनच्या जगात इतक्या झपाट्याने प्रगती झाली. आज आपण कितीतरी गोष्टींसाठी फोनचा वापर करतोय.
Bill Gates यांनी Microsoft कंपनी बनवली. त्यामुळे computer सहज वापरणे आज जगाला शक्य झाले.
या सर्व लोकांनी आपले जग बदलले नाही का? त्यांनी स्वत:ला विचारले “मी कोणते काम चांगल्या प्रकारे करू शकतो? मला कोणती गोष्ट मनापासून करायला आवडते?”
ह्या लोकांनी मोठे स्वप्नं पाहिले. हे स्वप्नं त्यांनी स्वतःसाठी नाही पाहिले की मी मोठी कार घेईल, बंगला बांधेल. तर या लोकांनी जग बदलण्याचे स्वप्नं पाहिले. आपण या जगाला काय देऊन जाणार? आपण काय बदल घडवून जाणार? हा विचार त्यांनी सतत केला. त्यामुळेच ते एवढा मोठा धोका पत्करू शकले. त्यामुळेच कठीण प्रसंगी त्यांनी माघार घेतली नाही. कारण त्यांचे स्वप्नं फार मोठे होते.
सर्वांचाच उद्देश जगाला काहीतरी देऊन जाण्याचा नसेल. सर्वांनाच व्यवसाय करताना एवढे मोठे बनायचे नसेल. मग त्यांनी काय विचार करावा? जर जग बदलण्या एवढे मोठे स्वप्नं नसेल तर देश कसा बदलेल? ते पण नाही तर माझे राज्य कसे बदलेल? माझं शहर? माझ्या घराच्या आसपासचा परिसर कसा बदलेल? नाहीतर सर्वात शेवटी माझा स्वतःचा विकास कसा होईल? हा विचार करायला हवा.
सांगण्याचा मुद्दा हा की, व्यवसाय करताना आपण आपल्या व्यवसायाच्या माधम्यातून या जगाला, मानव समाजाला काय देऊ शकतो? असा उद्देश असावा. फक्त श्रीमंत होणे हा तुमचा उद्देश असेल तर तुम्ही एक स्वार्थी, नफ्याच्या मागे पळणारा व्यवसाय कराल. ज्यात पैसे कमावणेच सारे काही असेल. असे व्यवसाय दूरचा विचार करत नाही आणि स्वार्थीपणे नफा कसा वाढेल हा विचार करतात. असे व्यवसाय जास्त काळ टिकत नाहीत.
तुमचा व्यवसाय किती मोठा होईल, हे तुम्ही किती मोठा बदल घडवता यावर अवलंबून तर आहेच. पण उद्देश नेहमी देण्याचा असला पाहिजे, फक्त श्रीमंत होण्याचा नाही.
कधी Steve Jobs, Elon Musk, Bill Gates, Jack Ma यांनी लोकांना जाऊन विचारलं का? मी कोणता व्यवसाय सुरु करू? याउलट ह्या लोकांनी आपल्या व्यवसायासाठी अनेक गोष्टींचा त्याग केला. अनेकांनी त्यांना मुर्खात काढले तरी जगाविरुद्ध जाऊन हे लोक लढले. आपल्या व्यवसायासाला त्यांनी आपले जीवन अर्पण केले.
व्यवसाय कि नोकरी?
मी कोणता व्यवसाय सुरु करू, हा मुख्य प्रश्न नाही. मुख्य प्रश्न आहे मी व्यवसाय करू की नाही? आधी तुम्ही हे ठरवा कि तुम्हाला व्यवसाय करायचा कि नोकरी? कोणता व्यवसाय करावा ही नंतरची गोष्ट आहे. मी नोकरी सोडून व्यवसाय करू का ? हा आमचा लेख तुम्ही वाचू शकता.
नोकरी आणि व्यवसाय मध्ये मूळ फरक आहे की व्यवसायात तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकाव्या लागतात. तुम्हाला सर्व गोष्टींची जवाबदारी स्वीकारावी लागते. इथे तुम्ही तुमच्या साहेबाला दोष देऊन सुटू शकणार नाही. इथे तुम्हीच तुमचे बॉस आहात. कोणीतरी म्हटलेच आहे ना, “जर तुम्हाला वाटत तुमचे शिक्षक वाईट वाटत असतील तर बॉस मिळण्याची वाट पहा, आणि जर तुम्हाला वाटत तुमचा बॉस वाईट वाटत असेल तर तुम्हीच तुमचा बॉस होण्याची वाट पहा.“
व्यवसायात नोकरी पेक्षा जास्त धोका पत्करावा लागतो. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला विचारता मी कोणता व्यवसाय करू? तर तुम्हाला काय उत्तर अपेक्षित असतं? की कोणी असा व्यवसाय सांगावा जो मस्त चालेल, असा व्यवसाय सांगावा जो करणे सोपे असेल, असा व्यवसाय सांगावा ज्यात कमी गुंतवणूक असेल. एक तयार फॉर्म्युला द्यावा की मी कोणता व्यवसाय करू? हा प्रश्नच मुळात सुरक्षात्मक आहे. तुम्ही कोणता व्यवसाय करावा हे उत्तर कोणीच तुम्हाला देऊ शकत नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं स्वतःच असलं पाहिजे. तरच तो व्यवसाय यशस्वी होईल, कोणी दुसरा बोलतोय म्हणून केलेला व्यवसाय यशस्वी होईल का?
तुम्हाला उत्तरात असा व्यवसाय अपेक्षित आहे ज्यात धोका कमी आहे. तुम्हाला जर सुरक्षा हवी असेल तर तुम्ही नोकरी कडे जावे. तुम्हाला जर जास्त धोका घ्यायचा आहे तर व्यवसायाकडे यावे. व्यवसाय की नोकरी? काय उत्तर आहे तुमच्या प्रश्नाच?
जेव्हा तुम्ही विचारता कोणता व्यवसाय सुरु करू? तेव्हा तुमच्या व्यवसायाची सुरवात उधारीच्या ज्ञानावर सुरु होते. उद्या ज्याने तुम्हाला सल्ला दिला तो नसेल मग? जेव्हा व्यवसायात वाईट वेळ येईल तेव्हा तुम्ही काय करणार? जग कसे पटापट बदलत आहे. त्यामुळे तुमचा व्यवसाय पण आता पटापट बदलेल. तुम्ही कदाचित तोच व्यवसाय कराल पण त्याच स्वरूप बदलेल. तुम्ही आताही कदाचित किराणा मालच विकाल, पण online, home delivery, cash back हे शब्द तुमच्या व्यवसायात जोडले जातील. तुम्ही कदाचित कपडेच विकाल पण होऊ शकते भविष्यात तुमचे कपडे एवढे स्मार्ट होतील की ते तुमच्याशी संवाद साधतील. तुमच्या mood नुसार तुमचे कपडे रंग बदलतील. तुम्हाला कदाचित कधीच दुसरा ड्रेस विकत घ्यावा लागणार नाही, तुमचा ड्रेस तुम्हाला हवे तसं रूप घेईल.
महत्वाचा सांगायचा मुद्दा इथे हा की, आपण जो व्यवसाय करणार आहोत, त्यात यश मिळेल कि नाही? तो टिकेल का नाही? किंवा त्याच प्रारूप किती बदलून जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे व्यवसाय करायचाच, हे तुमच नक्की झाले तर हा ना तो व्यवसाय तुम्ही करालच. महत्वाचं आहे तुमची मानसिकता व्यवसाय करण्याची होणं, ती झाली की, तुम्ही स्वतःसाठी योग्य व्यवसाय शोधून काढणार वा निर्माण करणारच.
व्यवसाय करायला पैसा नसेल तर काय करावे ?
व्यवसायाकरिता निधी उभारण्यासाठी आपण कमीत कमी ४ प्रकारच्या भांडवलाचा वापर करू शकता:
– आर्थिक भांडवल (पैसे)
– मानवी भांडवल (कर्मचारी)
– सामाजिक भांडवल (संबंध)
– मानसिक भांडवल (इच्छा)
आपल्याकडे पैसे नसल्यास, सर्जनशील व्हा आणि इतर ३ चा वापर टिकण्यासाठी करा (किंवा पैसा मिळविण्यासाठी).
– James Clear
MRP - Rs. 299/- (Get in Rs. 49)
MRP - Rs. 199 (Get in Rs. 99)
(e4 उद्योजक टीम!)
Start Career In Freelacing Field
Need
Whatsapp Group Admin
Online Book Seller
Online Spoken English Teacher
Marketing Executive
E4 Team Member
-----------------------------------------
e4 service
e-learning and earning platform for all
WhatsApp Broadcasting Network
(e4 पोस्ट कॉर्नर +)™
इथे उद्योग, व्यवसाय, करीअर, व्यक्तिमत्व विकास, सक्सेस मंत्रा, वाचनीय पुस्तके, इंग्रजी, फ्रिलांसिंग जॉब्स इत्यादी विषयांवरील
अनेक लेख वाचायला मिळतात.
Follow Us On Facebook
Follow Us On Instagram
तुमचे प्रश्न, अडचणी, शंका विचारण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी आमच्या टीम मेंबरला व्हॉट्सॲप मेसेज किंवा कॉल करा
Customer Call Center Number
(24/7 Whatsapp And Calling Support)
Copy the Number And Call Now
+91-913-007-3071
e4 service, Maharashtra, India - 431114
E-mail : e4service4u@gmail.com
Copyright 2020 © e4 service (All Rights Are Reserved)
Comments
Post a Comment