Skip to main content

जाणून घ्या तुमची जीवनशैली..!

 

आपल्या जीवनशैली वरूनच आपली गरिबी आणि श्रीमंती ठरत असते! तुमची जीवनशैली कशी आहे?  याचा विचार करून त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा व त्यानुसार आपली जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करावा. आपली जीवनशैली एक चांगली, सदृढ, सुरक्षित, आरोग्यदायी आणि विशेष म्हणजे श्रीमंतीकडे नेणारी असावी. 


श्रीमंत माणसाची जीवनशैली आणि स्टाइल अशी असते

उत्पन्न - बचत - शिल्लक खर्च


मिळालेल्या उत्पन्नातून अगोदर बचतीची रक्कम वेगळी करून ती योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यावर जे पैसे शिल्लक राहतात त्यातून खर्च करणे.


गरीब माणसाची जीवनशैली आणि स्टाईल कशी असते उत्पन्न - खर्च - शिल्लक राहिली तर बचत 

गुंतवणुकीचा प्रश्नच येत नाही


श्रीमंत माणसं आकाशात असूनही जमिनीवर पाय ठेवून असतात आणि गरीब माणसं जमिनीवर राहून आकाशाला हात लावण्याच्या बाता मारतात, म्हणजे यश मिळवण्यासाठी श्रीमंत होण्यासाठी काहीच कृती न करता नुसतं श्रीमंत होण्याचा विचार करत असतात आणि बाता मारत असतात. 


गरीब माणसं घरी बसण्याचे हे प्रमुख कारण 

आलेल्या उत्पन्नातून अगोदर नको तेवढा खर्च करून मग काही शिल्लक राहिले तरच बचत


बऱ्याचदा उधळपट्टी स्वभावामुळे बचत होण्याचा प्रश्नच येत नाही कारण गरीब माणूस फक्त आजचा विचार करतो उद्याचा अजिबात नाही. तर श्रीमंत माणूस उद्याचा विचार करतो तेही आजच्या सह.


श्रीमंत व्यक्ती कडे नवीन गोष्टी शिकण्यासाठी नेहमी वेळ असतो,

गरीब व्यक्तीकडे नवीन गोष्टी शिकण्यासाठी कधीच वेळ नसतो



e4 उद्योग-व्यवसाय प्रशिक्षण केंद्र

Learn Now


e4 पोस्ट कॉर्नर महत्त्वाचे बोलू काही

Follow Now


e4 टीमचे सदस्य बनून स्वतःचा इन्कम सोर्स निर्माण करा

Learn More

Comments

Post a Comment