विचार - प्रा. नामदेवराव जाधव, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वंशज
गरीबी कडे नेणार्या वस्तू खरेदी करणे टाळा. आवश्यक तेवढे साधे राहणीमान ठेवा. लोकांना आपण श्रीमंत नसताना श्रीमंत असल्याचा भास करण्याचे नाटक टाळा.
गाडी खरेदी करणे लांबणीवर टाका अथवा टाळा. गाडी खरेतर बरबादी असते हे घेतल्यावर काही दिवसातच कळते. पण लगेच विकायला गेले तरी त्यावर घसारा लागू होतो. गाडी विकली तर अब्रू जाते. ठेवली तर गरिबी येते. गाडीच काय अशी कोणतीही वस्तू जी हातात घेतल्या बरोबर किंमत कमी होते अशा वस्तू घेणं टाळा.
मोठ्या लोकांची नक्कल करून पैसे घालवण्यापेक्षा आपल्या ऐपतीप्रमाणे राहा.
वाजत गाजत लग्न, वाढदिवस, बारसे, जत्रा असल्या अनुत्पादक गोष्टी एकतर बंद करा किंवा कमी खर्चात होतील असं बघा.
ऊठसूट हॉटेलमध्ये जेवायला जाणं टाळा. कधीतरी गेलात म्हणून काही कोणी डोक्यात दगड घालत नाही. पण रोज गेला तर दुसऱ्याने दगड डोक्यात घालण्याची गरज नाही.
रातोरात मालामाल करणाऱ्या योजनांच्या आमिषा पासून दूर राहा. अशा योजना म्हणजे तुमच्याकडे जमलेले पैसे काढून घेण्याचा चक्रव्हूव असतो. कमी फायदा मिळाला चालेल पण मूळ भांडवल बुडता कामा नये. अतिघाई हाती असलेली संपत्ती घेऊन जाई असे होऊ देऊ नका.
हाती आलेला पैसा दाबून ठेवू नका, पुरून ठेवू नका, तो गुंतवणूक करा. बीजापासून झाड करायचं तर ते लावावं लागत. तसं पैसा आला की पेरत रहा. पैसा पडून राहिला तर तुम्हालाही एक दिवस पडीक व्हावं लागेल.
पैसा ही मोठी ताकद आहे, पण ते डोक्यात घुसू देऊ नका. पैसा डोक्याने वाढतो पण डोक्यावर बसला तर आपल्याला आयुष्यातून उठवू शकतो. तेव्हा नम्रता सोडू नका. उद्धटपणाने पैसा जातो अगदी नको त्या ठिकाणी आणि नको त्या भानगडीत. त्यामुळे सावध रहा.
चांगली माणसं सोडा आणि मूर्ख माणसं जवळ करा हा गरीब होण्याचा सर्वात सोपा शॉर्टकट. गुलछबू आणि खूष मस्करे यापासून चार हात लांब राहा.
गरज भागेल अशा छोट्या घरात रहा. ऐपत नसताना उगाच मोठा फ्लॅट घेऊन सत्यानाश करून घेऊ नका. कर्ज काढून मोठं घर घेण्यापेक्षा छोटं पण रोखीत घर घ्या नाहीतर राखेत जावं लागेल. तेव्हा हक्काचं घर घ्या पण कर्जाचं नको.
धन्यवाद
e4 Team, मराठी उद्योजक गृप
उठ, मराठी माणसा जागा हो, नोकर नाही तर मालक हो! e4 Team चे सदस्य बना व नोकर म्हणून नाही तर मालक म्हणून व्यवसाय वाढवा.
e4 उद्योजक, महाराष्ट्र!
Comments
Post a Comment