जगातील सर्वच श्रीमंतांनी अगदी शून्यातूनच सुरुवात केली आहे. यातील कित्येक लोक प्रसंगी उपाशीपोटी देखील झोपले आहेत. गरिबीवर मात करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आणि परिस्थितीत बदल करण्याची महत्त्वाकांक्षाच त्यांना श्रीमंतीकडे पाऊल टाकायला भाग पाडते.
गरिबीच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा विचार करायला वेळ काढणं हीच खरी श्रीमंतीची सुरुवात असते. बुद्धी हेच भांडवल आपण उभे केले तर सगळे जग सहज जिंकता येते. श्रीमंत होण्यासाठी शालेय शिक्षणाची अट अजिबात नसते. तुमची नजर उघडी आणि दृष्टी दूरचं पाहणारी असेल तर तुम्हाला वर्तमानासह भविष्याचा वेध घेता आला तर तुम्ही सहज श्रीमंत होऊ शकता.
श्रीमंतीचा प्रवास तुम्ही अगदी शून्यातून करत थोडेसे उत्पन्न त्यातून बचत-गुंतवणूक पुन्हा उत्पन्न आणि बचत-गुंतवणूक असा वनवे प्रवास चालू ठेवलात तर श्रीमंत सहज होता येते. साधी राहणी प्रचंड काम करण्याची तयारी आणि योग्य नियोजन या बळावर श्रीमंतीचे दार उघडता येते. आवडीचे काम मनापासून करत गेलात तर मनासारखे पैसे मिळायला वेळ लागत नाही.
पैसे बुद्धीनेच कमवायचे आणि बुद्धीने गुंतवत जायचे. सुरुवातीला फक्त काही दिवस तुम्ही पैशासाठी काम करा नंतर मात्र पैशालाच तुमच्यासाठी काम करायला लावा. प्रयत्न करणार्यांनाच यश मिळते हे लक्षात ठेवून अपयशाचा विचार मनात अजिबात आणू नका. कारण तुम्हाला श्रीमंत करणारी जगाच्या पाठीवर एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे
तुम्ही स्वतः
धन्यवाद!
भारत पाटील
e4
पोस्ट कॉर्नर महत्त्वाचे बोलू काही
Comments
Post a Comment