Skip to main content

हीच वेळ आहे स्वतःला बदलण्याची...!

 





आजची परिस्थिती प्रत्येकाला माहीत आहे. कोरोना इफेक्ट मुळे आज जग प्रचंड प्रमाणात बदलतंय! जे बदल 2030 मध्ये होणार होते, ते बदल आज घडताना दिसून येत आहेत.

प्रत्येकाचे काही ना काही तरी नुकसान झालेच आहे. यामुळे अनेक जण बेरोजगार झाले, बेघर झाले. चांगले उद्योग-व्यवहारही बंद पडले. आता सर्व लोक एकत्र येणार नाहीत. आज प्रत्येकजण एकत्र येण्यासाठी घाबरत आहेत.

जगाची नाही तर आपल्या देशाची आणि महाराष्ट्राचीही परिस्थिती पण अशीच आहे. मग आपण आतापर्यंत जी कामे करत होतो ते कोरोनामुळे बंद पडले आहेत. रोजगारही बंद पडले आहेत. 

तर अशा परिस्थितीत आपण स्वतःला बदलायला हवं. वेळे बरोबर बदलणाऱ्या या जगामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी आपण काही बदल स्वीकारायला हवेत, काही नवीन गोष्टी आत्मसात करायला हव्यात. तर मग आता नेमकं त्यासाठी काय करावं!

मित्रांनो, 
हीच वेळ आहे की इतक्या दिवसानंतर आपण आपल्याला पाहिजे तसा स्वतःला वेळ देऊ शकतो. याआधी इतका वेळ आपल्याला कधीच मिळाला नसेल. आपण सर्व सामान्यता आज जास्तीत-जास्त वेळ हा घरामध्येच घालवत आहे. हा वेळ आपल्यासाठी एक मैलाचा दगड ठरू शकतो. या वेळेत तुम्ही घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य दिशेने वाटचाल करण्यास मदत करू शकतो. 

तुम्ही एखादी फिल्म पहिलीच असेल. त्याची अगोदर डायरेक्टरला स्क्रिप्ट पाहिजे. स्क्रिप्ट असेल तरच तो पिक्चर अस्तित्वात येतो. तसंच आपल्या आयुष्याचं आहे. आपल्या आयुष्याची स्क्रीप्ट लिहिणे हे आपल्याच हातात असते.

हा वेळ तुम्ही तुमच्या आयुष्याची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी वापरू शकता. त्यामुळे आता तुम्ही एक नोटबुक घ्या. ही एक तुमची स्वतःची वैयक्तिक डायरी असायलाच पाहिजे. यात तुम्ही तुमच्याबद्दल, तुम्ही ठरवलेल्या ध्येयांबद्दल, तुमच्या कामांबद्दल अशा अनेक गोष्टी या वहीमध्ये लिहिणार. 


आता हा विचार करा की मी दररोज एक तास स्वतःला देईल. या वेळेत तुम्हाला तुमच्या जीवनाची, तुमच्या आयुष्याची संपूर्ण स्क्रिप्ट लिहायची आहे. होय, तुम्हाला हे लिहायचं आहे. सुरुवात तर करा, पुढे आपोआप नेमकं काय लिहायचं आहे हे तुम्हालाच लक्षात यायला लागेल. कारण तुमचं आयुष्य तुम्हाला कसं घडवायचं हे फक्त तुम्हीच लिहू शकता, दुसरं कोणी नाही. 

तर तुम्ही म्हणाल जग बदलतंय आणि मी फक्त लिहितोय याने काय फरक पडेल, पण तसे नाही. तुम्ही जे लिहिणार ते आता इथून पुढे नेमकं तुम्हाला भविष्यात काय करायचं आहे किंवा काय कराव लागेल याबद्दल तुम्ही लिहिणार आहात. मग तुम्हाला तुमचा निर्णय घेण्यासाठी तुम्ही लिहिलेल्या स्क्रिप्टची तुम्हाला मदत होईलच. 



सुरुवातीला तुमचं स्वतःचं स्वॉट ॲनॅलिसिस (SWOT Analysis) लिहिण्याचा प्रयत्न करा. 

Swot Analysis कसे करावे, हे वाचण्यासाठी येथे क्लिक करा. (Learn Now) जेवढ्या लिहिता येतील तेवढ्या स्वतःच्या स्ट्रेंथ लिहून काढा आणि तुमच्या स्ट्रेंथचा फायदा काय आहे,  त्यांचे संधीमध्ये रूपांतर करता येईल का याचा विचार करा. म्हणजेे तुमचं एखादं स्किल किंवा आवड किंवा ज्ञान इत्यादी गोष्टींचा फायदा काही नवीन जॉब करण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी होईल का याचा विचार करावा आणि ते सविस्तर लिहून काढावे. 
 
तसेच तुमच्या कमकूवत बाजू लिहून काढा. त्यामुळे तुम्हाला कोणत्या अडचणी येतील, तुमचे कोणते नुकसान होईल ते सविस्तर पणे लिहायचा प्रयत्न करा. यामुळे माझ्यात कोण-कोणत्या गोष्टींची कमतरता आहे त्याची स्पष्टता येण्यासाठी मदत होईल. मग त्याची भरपाई करण्यासाठी मी नेमकं काय करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी शिकायला पाहिजे, कोणती माहिती वाचायला पाहिजे, कोणतं ज्ञान घ्यायला पाहिजे यांचा विचार यायला लागेल, तो सविस्तरपणे वहीमध्ये लिहून काढा.

मित्रांनो तुमचं मन एवढे शक्तिशाली आहे की तुम्हाला येणाऱ्या सर्व समस्यांचे निराकरण आणि त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे त्यांचं सोलुशन देईल. होय, तुमच्या मनाची असीमित शक्ती कशी काम करते. 

मित्रांनो आज माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. जर तंत्रज्ञानाचा आपल्या करिअरमध्ये, व्यवसायामध्ये वापर होत नसेल तर आपण अजूनही मागेच आहोत. आपण करत असलेल्या कामांमध्ये टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. सर्वांकडे आज स्मार्टफोन असेल परंतु पाहिजे तसा स्मार्टनेस नाही. अनेक गोष्टी आहेत ज्या टेक्नॉलॉजी च्या मदतीने आपण अगदी सहज आणि पटकन करू शकतो.

 

तुमच्या मोबाईलचा वापर करून तुम्ही घरबसल्या आज अनेक कामे करून पैसे कमवू शकतात. तर याचाही विचार तुम्ही आतापासूनच करायला हवा. कारण बऱ्याच वेळेस आपण नवीन गोष्टी आत्मसात करायला मागेपुढे पाहत असतो. मोबाईल मध्ये युट्युब आहे. नेट असेल तर नवीन माहिती, नवीन आयडियाज, नवीन कोर्सेस यांची माहिती घ्यायला लागा. तुम्हाला जे हवं असेल ते युट्युब आणि गुगल वर शोधायचा प्रयत्न करा. त्यातील जी महत्त्वाची माहिती उपयोगी वाटेल ती तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढा. 

आता मुद्द्यावर येऊयात, प्रत्येकाला यशस्वी बनायचंय, स्वतःला आणि कुटुंबाला सांभाळायचे. तर प्रत्येक जण पैसे कमवण्याचे मार्ग शोधत आहे. मग आपण पण हा विचार करावा की अशी कोणती गोष्ट आहे ते केल्याने आपला इन्कम सोर्स तयार होईल, आज नाहीतर उद्या त्यातून काही पैसे यायला लागतील. हे गरजेचे आहे. आज विचार केला तर उद्या त्याचा फायदाच होणार. मग एखादं उपयोगी असलेलं स्किल शिकावं, ज्ञान मिळवावे, नवीन गोष्टी शिकाव्यात. यामुळे आपला वेळ जास्तीत जास्त या कामांमध्ये जाईल. आपला टाईमपास होणार नाही. 



तुम्ही दुसरी एक गोष्ट शिकायला पाहिजे ती म्हणजे विकता येणे म्हणजेच सेल करणे. प्रत्येक जण हा मुळातच एक सेलर असतो. आपण जे काहीही शिकतो, डिग्री घेतो, जॉब करतो, व्यवसाय करतो ते फक्त आणि फक्त पैसे मिळवण्यासाठीच. आणि त्याच्या मोबदल्यात आपण एक तर काम करतो म्हणजेच दुसऱ्यांना किंवा कंपनीला सर्विस देतो किंवा प्रोडक्स विकतो. 

आता अनेकांना सेलर म्हणलं की थोडं कमीपणा असल्यासारखं वाटतं‌. परंतु असे काहीच नाही कारण आज जगातील जेवढे श्रीमंत व्यक्ती झालेत ते फक्त या एकाच गोष्टीमुळे ते म्हणजे 'विकता येणे'. ‌

तर आतापासूनच तुम्ही हा विचार करावा की मी काय विकलं पाहिजे, कोणती अशी गोष्ट आहे जी मी विकून पैसे कमवू शकतो. मग ते तुमची सर्विस असो किंवा प्रॉडक्ट असो. खूप मोठा विचार केल्यापेक्षा छोट्या-छोट्या गोष्टींपासून आपण सुरुवात करायला हवी. मग तुम्ही काही नवीन कोर्सेस तयार करू शकता, वाचण्यासाठी पुस्तके बनवू शकता, तुम्हाला एखाद्या विषयाचे नॉलेज असेल तर त्याविषयी मार्गदर्शन करू शकता, तुमच्याकडे एखादा स्किल असेल तर ते तुम्ही तुमच्या फ्री वेळेमध्ये त्याचे व्हिडिओज बनवून तुम्ही ते विकू शकता. अशा अनेक गोष्टी असतील त्याचा आतापासूनच आपण विचार करावा.

जेवढी शक्य होईल तेवढे डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करायला हवा. 

तर मित्रांनो हा लेख कसा वाटला मला व्हाट्सअँप ला कमेंट करुन सांगा. तसेच आम्ही तुम्हाला 'Know Yourself - 100%' हा कोर्स देतोय! आम्ही तुम्हाला या कोर्स मध्ये तुमचा IQ, EQ, 10 Intelligence, Strengths, Weaknesses, Opportunities, Threats आणि बरंच काही या कोर्स मध्ये शिकवतो! जर तुम्हाला खरंच या कोर्स बद्दल जाणून घ्यायचा असेल तर नक्कीच संपर्क करा.


Sayali Sawant, Personality Development Coach
---------------------------------
e4 service team
Call or Whatsapp Us
9130073071
E-Mail : e4service4u@gmail.com

Comments