Skip to main content

खरंच माणूस कशाने बदलतो?


खरंतर 'विचारच' माणसाला बदलत असतात. 'विचारच' माणसाला 'यशस्वी' किंवा 'अपयशी' बनवतात! प्रत्येक माणसाच्या विचारा वरूनच त्या माणसाची प्रगती किंवा अधोगती होत असते. म्हणून माणसाला बदलण्याची खरी ताकद ही 'विचारातच' असते आणि ते विचार प्रेरणादायक असायला हवेत. तर प्रेरणादायी विचारांची गरज काय हे या लेखात पाहूया!



वास्तविक आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की, आयुष्यात प्रेरणादायी विचारांची अशी वेगळी गरज काय आहे? पण खरं सांगू का मित्र-मैत्रिणींनो. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी वाईट परिस्थिती येतेच. मग ती शारीरिक असो, भावनिक असो वा आर्थिक असो. प्रत्येक माणूस या परिस्थितीतून जातोच. या जगात असा एकही माणूस नाही ज्याला कधी दुःखाचा सामना करावा लागला नाही. त्यामुळे असे प्रेरणादायी विचार मराठी आपल्याला जगायला बळ देतात आणि अशा परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मदत करत असतात. या विचारांनी आपल्याला जगायला आणि त्या संकटांचा सामना करायला बळ मिळतं. काही लोकांना हे फक्त संवाद वाटतात पण हे खरं आहे की, त्या परिस्थितीतून जात असताना अशी वाक्यच असतात जी पुन्हा यातून उभं राहण्यासाठी बळ देत असतात. ती एक प्रकारे आपलं आयुष्य बुस्ट करत असतात. अर्थात आपल्या आयुष्याची गाडी पुढे ढकलायला मदत करत असतात.


1. स्वत:ला कमी लेखणं सोडा 

बऱ्याचदा अशी परिस्थिती येत असते की, संकटं ही एकामागून एक येत असतात. अशा वेळी स्वतःला कसं सांभाळायचं हे कळत नसतं. कोणी काही सांगितलेलं पटतही नसतं. सतत स्वतःला दोष देत माणसं जगायला लागतात. पण अशा वेळी खरं तर परिस्थिती काहीही असो स्वतःला कमी लेखणं सोडा. कारण तसं करत राहिल्यास, तुमचा आत्मविश्वास कमी होऊन काहीही करण्याची उमेद राहात नाही. शिवाय सतत स्वतःला कमी लेखत राहिल्यामुळे पुढे काय करायचं आहे हे विचार करण्याची क्षमताही कमी होते. त्यामुळे अशावेळी स्वतःला बढावा देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी स्वतःला कमी लेखणं सोडून द्या.




2. स्वत:च स्वत:ला गृहीत धरणं सोडा

कोणत्याही वाईट गोष्टीसाठी काही माणसं स्वतःला सतत दोष देत राहतात. त्यामुळे सतत त्याच गोष्टीचा विचार त्यांच्या मनात येतो. या विचारांमुळे सर्वच गोष्टी चुकीच्या ठरतात. कारण कोणतीही गोष्टी करायला जाण्याआधी आपण हा निर्णय चुकीचा घेतला असणार असंच या व्यक्तींच्या मनामध्ये येत राहतं. त्यामुळे स्वतःच स्वतःला गृहीत धरणं सोडा. तुम्ही जितकं स्वतःला अशा गोष्टींमध्ये गृहीत धरणार तितकं लोकही तुम्हालाच दोष देणार. त्यामुळे नक्की परिस्थिती काय होती आणि आपण काय केलं किंवा समोरच्या व्यक्ती कशा वागल्या याचा सारासार विचार तुम्ही करायला हवा.


3. इतरांशी सतत तुलना करणं टाळा 

आपल्यापेक्षा दुसरी व्यक्ती कशी सरस आहे हे सतत शोधू नका. कारण प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. त्यामुळे आपलं महत्त्व स्वतः जपा. मुळात कधीही दुसऱ्यांशी तुलना करणं चांगलं नाही. त्यामुळे तुम्ही जर हे करत असाल तर यामध्ये तुमचंच नुकसान आहे.


4. एखाद्या समस्येवर रडण्यापेक्षा त्यावर उपाय शोधायचा प्रयत्न करा 

कोणत्याही गोष्टीवर रडत बसणं हा उपाय कधीच असू शकत नाही. त्यामुळे आपल्याबरोबरच हे का घडलं किंवा अजून काहीतरी सतत विचार करून रडणं टाळा. बऱ्याचदा काही गोष्टीवर काहीच उपाय नसतो हे आपल्याला जाणवतं. त्यामुळे असं जेव्हा आपल्याला कळतं तेव्हादेखील रडू नका. कारण कितीही रडून त्यावर तोडगा तर निघणार नाही. त्यामुळे त्यावर दुःख करत बसण्यात आणि ते उगाळण्यात काहीही अर्थ नाही.


5. चुकतो तो फक्त आपला निर्णय

कोणतीही गोष्ट बिघडते तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला निर्णय चुकलेला असतो. त्यामुळे त्यासाठी कोणाला दोष देत बसू नका. दुसऱ्यांना दोष दिल्याने काहीही बदलणार नसतं. वेळ निघून गेलेली असते आणि निर्णयही घेतलेला असतो. त्यामुळे आपल्याला हे माहीत असायला हवं की, जो काही निर्णय घेतला गेला आहे तो सर्वस्वी आपला आहे. त्यामुळे काही झालं तरी चुकतो तो फक्त आपला निर्णय असतो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.


6. कर्तृत्ववान माणसं कधी नशीबाच्या आहारी जात नाहीत आणि नशीबाच्या आहारी गेलेली माणसं कर्तृत्ववान ठरत नाहीत 

‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ ही म्हण अर्थातच आपण सगळेच लहानपणापासून ऐकतो. पण तसं वागणारी माणसंही आहेत. तुम्हाला जर खरंच कर्तृत्व गाजवायचं असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही. केवळ नशीबावर अवलंबून राहणं योग्य नाही. कारण जर तुम्ही फक्त नशीबावर अवलंबून राहिलात तर तुम्हाला कधीच एका उंचीवर पोहचता येणार नाही.


7. तुमच्यावर जळणाऱ्या व्यक्तीचा तिरस्कार कधीच करू नका 

आपण काहीतरी वेगळं करत असू आणि समोरचा माणूस स्तुती करत असेल तर आपल्यावर जळणाऱ्या वक्तींची संख्या खूप जास्त प्रमाणात असते. पण त्यासाठी त्या व्यक्तीचा तिरस्कार कधीही करू नका. कारण त्या व्यक्तीकडे ही गोष्ट समजून घेण्याची तितकी ताकद नसते आणि मुळात आपल्याला त्या पातळीला उतरण्याची काहीच गरज नाही हे समजणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. कारण ती समोरची व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट समजते तेव्हाच जळू शकते. त्यामुळे तुम्ही सरस आहात आणि तुमच्या कामात योग्य आहात हेच सिद्ध होतं. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जाणंच जास्त योग्य आहे.


8. आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा 

तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी जर खूप प्रयत्न करावे लागत असतील तर हरू नका. ते प्रयत्न करत राहा. तुम्हाला सतत संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा. कारण संघर्षातूनच माणूस शिकत असतो. त्याला स्वतःला निर्णय घ्यायची आणि होणाऱ्या परिणामांची जाणीव ही संघर्षातूनच होत असते. आयतं कमावून ठेवलेलं किंवा संघर्षाशिवाय एखादी गोष्ट मिळाली तर त्याची माणसाला किंमत नसते. त्यामुळे संघर्ष हा अशाच व्यक्तींच्या वाट्याला येतो जो त्यातून बाहेर पडण्याची हिंमत ठेवतो. संघर्षाकडे नेहमी सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे.


9. संकटाबरोबर नेहमी संधी येते 

खरं तर संकटात आपण डगमगून जातो. पण प्रत्येक संकटाबरोबर एक संधी तुम्हाला आयुष्यात चालून येत असते. त्यामुळे डगमगून न जाता तुम्ही त्या संकटात धीराने उभं राहून संधीचं सोनं करायला हवं. आपली विचारशक्ती शाबूत ठेऊन कितीही संकट आलं तरीही परिस्थितीचा सामना करत उभं राहिलं पाहिजे. जेणेकरून या संकटातून बाहेर येऊन तुम्ही आलेल्या संधीचा खूपच चांगला फायदा करून घेऊ शकता. ज्याला साधारणतः आयुष्यात दुसरी संधी असं म्हटलं जातं आणि सहसा अशी संधी आली की, आयुष्याला नक्कीच कलाटणी मिळत असते.  


10. स्वप्न तीच आहेत जी तुम्हाला झोपू देत नाहीत 

प्रत्येकाला आयुष्यात स्वप्न पडत असतात. पण झोपल्यावर पडणारी स्वप्न वेगळी आणि उघडया डोळ्यांनी पाहायची स्वप्न वेगळी. कारण उघड्या डोळयांनी पाहिलेल्या स्वप्नांना एक दिशा असते आणि अशीच स्वप्न असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत आणि तुम्हाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन पोहचवतात. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक प्रेरणादायी वाक्य नक्कीच आहे. कारण प्रत्येक माणसाचं स्वप्न मोठं व्हायचं नाव कमावण्याचं असतं. पण यश त्यालाच मिळतं जो या स्वप्नांच्या मागे न झोपता अर्थात खऱ्या अर्थाने मेहनत करून लागतो.


11. तुमच्या गुणवत्तेवर कोणी शंका घेत असेल तर घेऊ द्या, कारण शंका ही सोन्याच्या शुद्धतेवरच घेतली जाते, लोखंडाच्या नाही! 

हे वाक्य नेहमीच जगायला बळ देतं. कारण निंदकाचे घर असावे शेजारी असं मराठीमध्ये म्हटलं जातं आणि ते खरंच आहे. आपले पाय नेहमी जमिनीवर राहायला हवे असतील तर आपल्यातले दोष सांगणाऱ्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला हव्या हे नक्की. त्यामुळे त्यांना आपल्या गुणवत्तेवर जितकी शंका घ्यायची असेल घेऊ द्या. त्यामुळे अधिक जोमाने आपल्याला हव्या त्या योग्य गोष्टी करायला आपल्याला बळ मिळतं हे नेहमी लक्षात ठेवा.  


12. अपयशाने खचू नका अधिक जिद्दी व्हा 

प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधीतरी अपयशाला सामोरं जाव लागतंच. पण अपयश आलं आहे म्हणून खचून न जाता, जिद्दीने ते अपयश परतवायची ताकद ठेवा. कितीही मोठं अपयश असो त्यातून जिद्दीने बाहेर येणं गरजेचं आहे. हे सतत स्वतःला समजावत राहिल्यास, तुम्ही पुन्हा एकदा नव्याने उभं तर राहताच. शिवाय तुम्हाला तुमच्यामधील असलेली जिद्द आणि चिकाटीची जाणीवही नव्याने होते.


13. काळ्याकुट्ट रात्रीनंतर सूर्य उगवतोच 

बऱ्याचदा सतत काही ना काहीतरी आपल्या मनाविरुद्ध घटना आयुष्यात घडत राहतात. पण त्याने खचून जाणं योग्य नाही. कारण जसा रोज सूर्यास्तानंतर सूर्योदय होत असतो. तसंच वाईट दिवस सरतात आणि चांगले दिवस येणार असतात. हा केवळ प्रेरणादायी विचारच नाही तर हे लोकांचे अनुभवही असतात. आयुष्य कायमस्वरूपी एकसारखं राहत नाही. तर प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःखाच्या सारीपाटाचा खेळ हा चालू राहतोच. जेव्हा वाटतं की, सर्व संपलं आहे तेव्हा स्वतःलाच हे समजावत राहणं गरजेचं आहे की, काळ्याकुट्टा रात्रीनंतर सूर्य हा उगवणारच आहे.


14. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही 

हे शंभर टक्के प्रेरणादायी वाक्य आहे. कारण ज्यांना स्वतःवर विश्वास असतो. ते दुसरे किती बलशाली आहेत याचा अजिबात विचार करत नाहीत. कारण त्यांना आपण काय करतो याकडे जास्त लक्ष द्यायचं असतं. स्वतःचं आयुष्य जास्त महत्त्वाचं. हा विचार प्रत्येकानेच अंगी बाळगायला हवा.


15. आपल्या कामामध्ये आनंद घेणं हेच समृद्धी असण्याचं लक्षण 

ज्यांना आपल्या कामात आनंद मिळतो त्या व्यक्ती सुखी असतात. कारण इतर गोष्टींमध्ये नाक खुपसत राहण्यापेक्षा आपण भले आणि आपलं काम भले यामध्ये कधीच कोणाचं नुकसान होत नसतं. शिवाय काम हीच पूजा असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या जीवनात कायम समृद्धी राहते.


(जाहिरात)

e4 Counseling Course

Know Yourself - 100%

स्वतःकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन

अधिक माहितीसाठी खालील नंबरला कॉपी करून कॉल करा

9130073071

Free Webinar Registration

Register Now


(जाहिरात)

e4 उद्योजक टीम

मित्रांनो, तुम्ही जर एखाद्या एक्स्ट्रा इन्कम सोर्स निर्माण करण्यासाठी इच्छुक असाल तर नक्कीच आमच्या टीम मध्ये जॉईन होऊ शकता!

अधिक माहितीसाठी खालील बटणावर क्लिक करा

Learn More


e4 उद्योजक टीम!

-----------------------------------------

e4 service 

e-learning and earning platform for all

Click Now



WhatsApp Broadcasting Network

(e4 पोस्ट कॉर्नर +)™


इथे उद्योग, व्यवसाय, करीअर, व्यक्तिमत्व विकास, सक्सेस मंत्रा, वाचनीय पुस्तके, इंग्रजी, फ्रिलांसिंग जॉब्स इत्यादी विषयांवरील 

अनेक लेख वाचायला मिळतात. 

Click Now


Follow Us On Facebook

Follow Now


Follow Us On Instagram

Follow Now

तुमचे प्रश्न, अडचणी, शंका विचारण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी आमच्या टीम मेंबरला व्हॉट्सॲप मेसेज किंवा कॉल करा

Chat Now 


Customer Call Center Number

(24/7 Whatsapp And Calling Support)

Copy the Number And Call Now

+91-913-007-3071

e4 service, Maharashtra, India - 431114

 E-mail : e4service4u@gmail.com


Copyright 2020 © e4 service (All Rights Are Reserved)

Comments

Post a Comment