Skip to main content

वक्तृत्व सुधारण्यासाठी काय करावे?





मुळात चांगल्या वक्तृृृृत्वासाठी कांहीतरी नवे अर्थपूर्ण सांगण्याजोगे आपल्याजवळ असायला हवे म्हणजे आपल्याला आपल्या विषयाचे संपूर्ण ज्ञान असायला हवे.


वक्तृृृृत्वाची भाषा, तिचे योग्य उच्चारण, योग्य किंवा उचितवेळी शब्दांवर आघात देत आवाज लहान मोठा करता येणे, शब्दांच्या उच्चारणांसोबत आवश्यक ते चेहर्‍यावरील हावभावात बदल व हातापायांच्या समर्पक हालचाली हे सर्व प्रभावी वक्तृृृृत्वाला आवश्यक बाह्य घटक आहेत. श्रोत्यांसमोर जाताना पुरेसा आत्मविश्र्वास हवा. भीती अजिबात नको. आपल्याला श्रोत्यांपेक्षा विषयाबद्दल जास्त माहिती असलीच पाहिजे आणि त्याबद्दल संपूर्ण आत्मविश्र्वास हवा. हे झाले मांडणी बद्दल.


पण उत्तम वक्तृृृृत्वासाठी आपल्याला नेमके श्रोत्यांपर्यंत काय पोचवायचे आहे? कोणते विचार, मुद्दे, माहिती श्रोत्यांना पटवून द्यायची आहे. ती कोणत्या पद्धतीने श्रोत्यांच्या मनात ठसवायची आहे, गळीं उतरवायची आहे? याचा अचूक अंदाज बांधून भाषणाला सुरुवात करायची असते. मुद्देसूद भाषण करण्यासाठी मांडायचे मुद्दे व त्यांचा अनुक्रम मनाशी आधी ठरवावा लागतो. सोप्याकडून अधिकाधिक कठीण अशा प्रकारे विचारांची मांडणी करावी लागते.


मधेच थांबायचे कुठे, पाॅजेस कुठे घ्यायचे, भाषण कुठे संपवायचे याचा विचार आधीच करावा लागतो. श्रोत्यांकडे बघत बघत आपल्या भाषणाचा होणारा परिणामांचा अंदाज घेत भाषण पुढे न्यावे. श्रोत्यांच्या जांभया, चेहर्‍यावरील औत्सुक्य, आनंद, कंटाळा टिपण्याची क्षमता हवी. अपेक्षित परिणाम साधत भाषण क्लायमॅक्सला नेवून थांबवावे. भाषण संपल्यावर श्रोत्यांना अजून तुम्हाला ऐकावे असे वाटत असतानाच भाषण थांबवणे यात खरी गम्मत आहे.


वक्तृृृृत्व सुधारायचे तर वरील सर्व विवेचन वाचून आपल्या वक्तृृृृत्वात काय त्रुटी आहेत ते पाहून आवश्यक ते बदल करावेत.


Comments

Post a Comment