Skip to main content

मुलांना भविष्यात स्वावलंबी आणि यशस्वी कसे बनवाल?

 

मुलांना भविष्यात स्वावलंबी आणि यशस्वी कसे बनवाल??


पालकत्व ही एक कला आणि खूप मोठी जबाबदारी आहेलहान मुलांशी संवाद साधताना प्रत्येक आई-वडील  अथवा इतर मोठ्या मंडळींनी नेहमी सावधच असायला हवंमुलं जे ऐकतात किंवा पाहतात त्याचा परिणाम नकळत त्यांच्या मनावर होत जातोबालपणावर झालेल्या गोष्टींचा परिणाम मोठेपणी मुलांच्या वागणूकीत दिसून येत असतोयासाठी जर तुमच्या मुलांनी भविष्यात स्वावलंबी आणि यशस्वी व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर या टिप्स जरूर फॉलो करा.

 

1. मुलांवर मनापासून प्रेम करा

तुम्ही म्हणाल की, आमचं आमच्या मुलांवर प्रचंड प्रेम आहेचतुम्हालाअसंं वाटणं अगदी स्वाभाविक आहे कारण प्रत्येक आई-वडीलांचं आपल्या मुलांवर प्रेम हे असतंचपण तुमचं मुलांवर असलेलं प्रेम त्यांना सतत जाणवत राहील याचीही काळजी घ्याकारण बोलताना झालेल्या गैरसमजातून जर त्यांना तसं जाणवलं नाही तर मुलांच्या मनात तुमच्याबद्दल एकप्रकारची अढी निर्माण होऊ शकतेजी भविष्यात पुढे कायम तशीच राहतेप्रेमातसमोरच्या व्यक्तीला पूर्णपणे बदलण्याची ताकद असतेत्यामुळे जर तुमची मुलं तुमच्यासोबत नीट वागत नसतील तर तुमच्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे

2. मुलांच्या समस्यांचे वेळीच समाधान करा

मुले घराबाहेर असताना म्हणजेच शाळेतपाळणाघरविविध प्रकारचे क्लासेस त्यांच्यासोबत दिवसभर काय काय घडलं याची विचारपूस कराज्यातून तुम्हाला त्यांच्या समस्या समजू शकतीलमुलांच्या जीवनात असलेल्या कोणत्याही लहानसहान समस्येकडे दुर्लक्ष करू नकाकारण कधी कधी याचा परिणाम फारच घातक ठरू शकतोत्यांना त्यांच्या समस्या स्वतः सोडवण्यासाठी मदत कराज्यामुळे त्यांना तुमचा आधार वाटेल आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वाढू लागेलशिवाय लहान मुलांना सतत प्रश्न विचारण्याची सवय  असते त्यातून त्यांच्या बुद्धीचा विकास होत असतोतुमच्या मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे द्याजर प्रश्न थोडासा अडचणीत आणणारा असेल तर एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यामात्र मुलांच्या प्रश्नाकडे मुळीच दुर्लक्ष करू नका अथवा त्यांना ओरडू नका

3. तुमच्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नका

बऱ्याचदा परिक्षेतील मार्क अथवा एखाद्या स्पर्धेतील यशाबाबत मुलांशी तुलना केली जातेमुलांना जास्त मार्क्स मिळावेत अथवा त्यांना स्पर्धेत जिंकण्याची जिद्द वाटावी यासाठी घरातीलशेजारील इतर मुले अथवा मित्रमंडळींच्या मुलांच्या तुलनेत उभं केलं जातंयाचा परिणाम क्वचितच चांगला येऊ शकतोकारण बऱ्याचदा यामुळे मुलं नैराश्याच्या कोषात जाण्याची जास्त शक्यता असतेम्हणूनच तुमच्या मुलांना कधीच गृहीत धरू नकाप्रत्येक मुलाचं व्यक्तिमत्व वेगळं असतं आणि प्रत्येकाकडे काहीनाकाहीतरी वेगळे गुण असतात याची सतत जाणिव ठेवातुमच्या मुलांमधील कलागुणांना ओळखून त्यांच्या गुणांना कसं विकसित करता येईल याचा विचार करा

4. मुलांचे कौतुक करण्यास विसरू नका

कौतुक सर्वांनाच आवडत असतंजेव्हा  जेव्हा एखाद्याचं कौतुक केलं जातं त्या व्यक्तीला त्या कौतुकामुळे त्याचं  काम अधिकचांगलं करण्याचा हुरूप येतोजर तुमच्या मुलांनी एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने केली असेल तर त्याचं मनापासून कौतुक करायला विसरू नकाबऱ्याचदा मुलं शेफारतील म्हणून पालक मुलांचं कौतुक करणं टाळतातमात्र असं  केल्यामुळे भविष्यात मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतोयासाठी मुलांच्या छोट्याछोट्या गोष्टींचं भरपूर कौतुक करा.  

5. सकारात्मक विचार द्या

मुलांना नेहमी सकारात्मक बोलण्याचीवागण्याची आणि ऐकण्याची सवय लावाकारण सकारात्मक विचारसरणीचा त्यांच्या मनावर चांगला परिणाम होऊ शकतोलहानपणापासूनच जर मुलं प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक विचारसरणीने पाहू लागली तर मोठेपणी त्यांना कधीच नैराश्य येत नाहीमात्र यासाठी पालकांनी त्यांच्यासोबत सतत पॉझिटिव्हच बोलायला हवंपालक हे मुलांसांठी नेहमीच आदर्श व्यक्तिमत्व असतातलहानपणी मुलांना मोठं झाल्यावर आपण आपल्या पालकांसारखं व्हावं असं नकळत वाटत असतंशिवाय मुलांवर पालक काय बोलतात यापेक्षा पालक कसे वागतात याचा अधिक परिणाम होत असतोम्हणूनच पालकांनी मुलांसमोर वागताना नेहमीच सावध राहायला हवं

-----------------------------------------

WhatsApp Broadcasting Network

(e4 पोस्ट कॉर्नर +)™


इथे उद्योग, व्यवसाय, करीअर, व्यक्तिमत्व विकास, सक्सेस मंत्रा, वाचनीय पुस्तके, इंग्रजी, फ्रिलांसिंग जॉब्स इत्यादी विषयांवरील 

अनेक लेख वाचायला मिळतात. 

Click Now


Follow Us On Facebook

Follow Now


Follow Us On Instagram

Follow Now

तुमचे प्रश्न, अडचणी, शंका विचारण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी आमच्या टीम मेंबरला व्हॉट्सॲप मेसेज किंवा कॉल करा

Chat Now


 E-mail : e4service4u@gmail.com


Copyright 2020 © e4 services (All Rights Are Reserved)

Comments