यशस्वी कसे बनावे - भाग १
स्वतःची ओळख :-
भाग १ मध्ये आपण आधी स्वतःची ओळख या विषयावर चर्चा करणार आहोत. आज पर्यंत जगामध्ये जेवढे काही यशस्वी लोक आहेत तर पहिल्यांदाच त्यांना त्यांची स्व-ओळख होती म्हणजे त्यांनी स्वतःला चांगल्याप्रकारे ओळखलं होतं. अजून सांगायचं झालं तर स्वतःबद्दल पूर्ण माहिती असणे. मी कोण आहे, मी कसा आहे, मी कुठे आहे, या प्रश्नांची उत्तरे त्यांनी सुरुवातीला शोधायचा प्रयत्न केला होता आणि मग त्यातूनच त्यांना एक हळूहळू स्वतःची ओळख होत गेली आणि नंतर त्यांच्या अंगी असलेल्या काही गुणवैशिष्ट्यांमुळे आणि शिकत राहिल्यामुळे आज ते यशाच्या शिखरावर आहेत.
म्हणून सर्वप्रथम आपण कसे आहोत. आपल्या भूमिका कोणत्या आहेत. आपल्यातील क्षमता काय आहेत, आपल्यातील सद्गूण कोणते आणि दुर्गुण कोणते हे आपणास माहीत असायला हवे. तेव्हाच आपण आपल्या सद्गूणांचा वापर करून आणि दुर्गुणांवर विजय मिळवत यशाकडे एक एक पाऊल पुढे जाऊ शकतो. स्वतः स्वतःची ओळख करण्यास शिका. ती करताना कल्पकतेला बाजूला ठेवून जास्तीत जास्त वास्तविक काय आहे याकडे बघा. आपण मानव आहेत व आपणास शरीर, मन व बुद्धी आहे. शरीरास पचेंद्रिय आहेत व मन हे विचारांचे व भावनांचे घर आहे. आपल्याला बुद्धी द्वारे वास्तविकतेचा व कल्पकतेचा वापर करून त्यांच्याद्वारे चांगले व वाईट ओळखून जीवन जगता आले पाहिजे. त्यासाठी स्वतःची पूर्ण ओळख असली पाहिजे.
एक उदाहरण घेऊन आपण समजून घेऊयात. समजा तुम्ही एका मजबूत आणि अलिशान असलेल्या BMW कारमध्ये आहात. तुम्हाला त्या कार मधून तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशन ला पोहोचायचे आहेत. परंतु तुमचा रस्ता खूपच वेडावाकडा असल्यामुळे आणि माहीत नसल्यामुळे तुम्हाला तुमच्या गाडीची स्पीड दर तासाला फक्त 20 ते 30 किलोमीटरच ठेवावी लागत आहे. तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत पटकन जाता येईल का? तर उत्तर 'नाही' असं असेल.
परंतु तुमचा रस्ता अगदी व्यवस्थित सरळ आणि दिसणारा असेल तर मला सांगायची गरज नाही. तुमची स्पीड ही दोनशेच्यावर सुद्धा असू शकते.
म्हणून तुमच्याकडे सुद्धा तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्हाला जे ध्येय गाठायचे आहेत त्या ध्येयाकडे जाणारा रस्ता तुम्हाला स्पष्टपणे अगदी क्लियर माहीत असला पाहिजे. त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय सहज आणि लवकर गाठू शकता.
असे बरेच जण आहेत की अपुरी माहिती घेऊन रस्ता चालायला सुरुवात करतात आणि शेवटी मग काय बाकीच्यांच्या गाड्या सुसाट वेगाने त्यांच्यापुढे निघून गेलेल्या असतात. हा पुन्हा नवीन रस्ता शोधायचा प्रयत्न करतो आणि नवीन सुरुवात सुद्धा करतो परंतु तेही अपूर्ण माहिती घेऊन… मग मित्रांनो तुम्हीच सांगा जर तुमचा रस्ताच तुम्हाला क्लियर माहीत नसेल तर खरंच तुम्ही पटकन तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता का?
मित्रांनो, आपण स्वतःलाच न ओळखता काम करायला सुरुवात करतो, मेहनत घेतो, खूप कष्टही करतो, परंतु आपल्याला पाहिजे तसे यश मिळत नाही याच्या मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपण स्वतःला कधी ओळखूनच घेत नाही...
म्हणून त्यासाठी तुमची तुम्हाला स्वतःची ओळख असायलाच पाहिजे, तर आणि तरच तुम्ही तुमचं ध्येय पटकन घाटू शकता...!!
मित्रांनो जर खरंच तुम्हाला तुमच्या स्वतःच्या स्ट्रेंथ आणि विकनेस काय आहेत ही जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमचा (Know Yourself - 100%) हा कोर्स नक्कीच करायला पाहिजे.
-----------------------------------------
WhatsApp Broadcasting Network
(e4 पोस्ट कॉर्नर +)™
इथे उद्योग, व्यवसाय, करीअर, व्यक्तिमत्व विकास, सक्सेस मंत्रा, वाचनीय पुस्तके, इंग्रजी, फ्रिलांसिंग जॉब्स इत्यादी विषयांवरील
अनेक लेख वाचायला मिळतात.
Follow Us On Facebook
Follow Us On Instagram
तुमचे प्रश्न, अडचणी, शंका विचारण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी आमच्या टीम मेंबरला व्हॉट्सॲप मेसेज किंवा कॉल करा
E-mail : e4service4u@gmail.com
Copyright 2020 © e4 services (All Rights Are Reserved)
Comments
Post a Comment