तुमच्या हाती पैसा आल्यावर तुम्ही काय करता?
तुमच्या हाती पैसा आल्यावर तुम्ही काय करता यावर तुम्ही गरीब राहणार किंवा श्रीमंत होणार हे अवलंबून असते.
गरीब राहणारी व्यक्ती पैसे आले की खर्चून टाकते, श्रीमंत होणारी व्यक्ती पैसे आले की गुंतवून टाकते.
गरीब माणूस फळ बी सकट खाऊन टाकतो, श्रीमंत माणूस फक्त फळ खातो आणि बी मात्र कायम शिल्लक ठेवतो.
गरिबाच्या हातातील पैसा म्हणजे एक पाऊल खड्ड्यात असते, तर श्रीमंताच्या हातातील पैसा म्हणजे एक पाऊल पुढे असते.
श्रीमंत माणसाने सगळी कामे करून ठेवलेली असतात तरीही त्याला सकाळी जाग येतेच आणि गरीब माणूस खूप काम बाकी असते तरीही त्याला बळजबरीने का होईना साडे आठ ला उठावे लागते.
काम वाढवत जातो तो गरीब राहतो आणि हाती घेतलेलं काम तत्परतेने संपवत जातो तो श्रीमंत होत जातो.
कामचुकारपणा हे गरीब होण्यामागील जगातील एक प्रमुख कारण आहे आणि अचूक काम करणे हे श्रीमंत होण्याचे जगातील एक प्रमुख कारण आहे.
e4 उद्योजक टीम
(e4 पोस्ट कॉर्नर +)™
इथे उद्योग, व्यवसाय, करीअर, व्यक्तिमत्व विकास इत्यादी विषयांवरील अनेक लेख वाचायला मिळतात.
स्वतःला स्वावलंबी बनवण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय वाढविण्यासाठी आणि स्वतःचा रोजगार स्वतःच निर्माण करण्यासाठी
(e4 पोस्ट कॉर्नर +)™ महत्त्वाचे बोलू काही
या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपच्या माध्यमातून प्रत्येकाला
Encourage | Educate | Empower | Employ
करणे हा आमचा उद्देश आहे.
अधिक माहितीसाठी खालील बटणावर क्लिक करा
All Rights Are Reserved ® e4 services 2020
Comments
Post a Comment