जशा सवयी तसे व्यक्तिमत्व!
आपल्या सवयींमधूनच आपले व्यक्तिमत्व बाहेर दिसून येत असते. आपलं यश-अपयश हेसुद्धा बऱ्याच पैकी आपल्या सवयींवर अवलंबून असते.
आपल्याला अशा अनेक सवयी असतात, ज्यामधून आपण दररोज आपले व्यक्तिमत्व प्रदर्शित करत राहतो. यामध्ये काही वाईट सवयी तर काही चांगल्या सवयी अंतर्भूत असतात. जितक्या वाईट सवयी तितकं आपले व्यक्तिमत्व नकारात्मक वृत्तीचे बनत जाते आणि जितक्या चांगल्या सवयी तितके आपले व्यक्तिमत्व सकारात्मक बनत जाते.
आणि प्रत्येकाला वाटतं की मला चांगल्या सवयी असल्या पाहिजे. परंतु बरेच जण वाईट सवयींच्या आहारी गेलेले असतात. त्यामुळे वाईट सवयी असणाऱ्यांच्या जीवनात नेहमी अपयश, दुख, कष्ट, राग, द्वेष, मत्सर, चिडचिड अशा भावना सतत येत असतात.
त्यामुळे चांगल्या सवयी आपल्या अंगी निर्माण करायलाच पाहिजे. आता मी या ठिकाणी आपल्याला एक अशी सवय सांगणार की ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात कधीच अपयशी होऊ शकणार नाही आणि ती सवय म्हणजे...
कोणतीही गोष्ट किंवा एखादं काम करताना एक्स्ट्रा मेहनत करणे, एक्स्ट्रा वेळ देणे. होय, हीच सवय आहे जी की नेहमी एक्स्ट्रा देण्याची, एक्स्ट्रा काम करण्याची भावना ठेवणे.
आता तुम्ही म्हणाल यात काय मोठी गोष्ट आहे!
पण आजपर्यंत जे पण लोक यशस्वी झालेले आहेत, त्यांनी या एकाच सवयीमुळे शुन्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. अनेकांनी यशाची शिखरं गाठली आहे. अनेक व्यक्ती लहानातून मोठे बनले या एका सवयीमुळे!
खरंच ही एक खुप चांगली सवय आहे. फक्त आपण एव्हढे लक्षात ठेवले पाहिजे की नेहमी त्या कामातून काही शिकता आलं पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्ही एका कंपनीत टेलिकॉलिंगचा जॉब करता, तुमचा एक मॅनेजर आहे. आता काही मॅनेजिंगची काम तो करत असतो. परंतु तुम्ही त्याला म्हणू शकता की तुमचं काही काम असेल तर मी माझ्या रिकाम्या वेळेमध्ये तुम्हाला ते
करून देईल. तर यामुळे त्या मॅनेजरच्या मनात तुमच्याबद्दल एक आदराची आणि आपुलकीची भावना तयार होईल. तुमची ओळख वाढेल आणि तुम्हाला जे काम देईल ते तुमच्यासाठी नवीन असेल, तर त्याच्याकडून ते तुम्हाला शिकायलाही मिळेल. तुम्ही अर्धा तास जेवढे शक्य होईल तेवढे एखाद्यावेळेस त्याचं काम करायला काहीच हरकत नाही. यामुळे तुमचा मॅनेजिंग स्किल्स अनुभवही वाढतो.
तर असच मित्रांनो प्रत्येक वेळेस आपण काहीतरी एक्स्ट्रा काम करायला पाहिजे, त्यातून काही शिकायला पाहिजे. यामुळे आपली प्रगती नक्कीच होते, प्रमोशन होण्यासाठी फायदा होतो, आपण त्या अनुभवाच्या जोरावर अजून काही नवीन जॉब किंवा व्यवसाय करू शकतो.
तर ही एक सवय आपल्याला आपल्या जीवनात कधीच अपयशी होऊ देणार नाही.
------------------------------------
e4 service
Encourage | Educate | Empower | Employ
Work From Home Jobs
---------------------------------
(पोस्ट कॉर्नर +)
(महत्त्वाचे बोलू काही
या 20,000 + सदस्य असणाऱ्या व्हाॅट्सॲप ब्रॉड कास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे.
इथे उद्योग, व्यवसाय, अर्थक्रांती, पुस्तके, नवीन कोर्सेस, सक्सेस मंत्रा, फ्रिलांसिंग जॉब्स व वर्क फ्रॉम होमच्या संधी, इ. विषयांवरील लेख व माहिती वाचायला मिळेल!
Join | Learn | Share | Earn
------------------------------------
e4 team
(पोस्ट कॉर्नर +)™ ग्रृपला जॉईन होण्यासाठी खालील नावावर क्लिक करा
पोस्ट उपयोगी आणि आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा
Comments
Post a Comment