यशस्वी कसे बनावे - भाग 3
(जसा व्यवहार तसे व्यक्तिमत्व)
प्रत्येक माणसांमध्ये चांगले व वाईट गुण असतात. फरक फक्त एवढाच असतो की काही माणसं आपल्या वाईट गुणांना वर येऊ देत नाही. सदाचारी, सुशील व्यवहार ते करत असतात. तर काही माणसे भावनांच्या आहारी जाऊन आपल्या वाईट गुणांना वाव देतात, जेणेकरून त्यांची कर्मेही तशीच होतात.
तेव्हा आपल्याला आपणात फार मोठ्या प्रमाणात बदल करण्याची काही आवश्यकता नाही. सर्वप्रथम स्वतःचे व्यक्तिमत्व ओळखण्यास शिका.
आपण स्वतःला निर्देशित करता की इतरांकडून निर्देशन घेता?
स्वतः बद्दल आपल्या मनात चांगला भाव आहे की वाईट?
आपण स्वतंत्रपणे विचार करतात की इतर लोक जे करतील तसे करतात?
लोकांच्या मनात आपल्याबद्दल कसे विचार आहेत व आपण खरंच तसे आहात का?
आपण किती जबाबदार आहात व चूक झाल्यास दोष कुणाला देता?
आपण वेळेचा वापर योग्य प्रकारे करता की आपला वेळ वाया जातो?
आपल्यातील राग, द्वेष, अहंकार, उत्सुकता, चिंता यांची तीव्रता किती आहे?
त्यांचा परिणाम काय होतो?
आपणाला आपला जीवनस्तर उंचावावासा वाटतो काय?
आपण समस्या सोडविण्याकडे लक्ष देता की इतरांना दोष देता?
आपण ज्या प्रकारची व्यक्ती आहात त्या प्रकारे आपल्या इच्छा-आकांक्षा असतात. माणसाच्या मूळ गरजा (अन्न, वस्त्र व निवारा) भागल्या की त्याला इच्छा असते, आपल्याला इतरांनी विचारावे, मान-सन्मान द्यावा. आपणाकडे सर्व सुखसोयी असाव्यात इत्यादी. या इच्छापूर्तीसाठी तो कर्म करत असतो.
(जाहिरात)
इच्छांवर तुमचे नियंत्रण नाही; परंतु तुम्ही त्या इच्छेसाठी करणाऱ्या कर्मावर तुमचे नियंत्रण आहे. तेव्हा आपल्या कर्मा द्वारे आपणास नेहमी फायदा होईल व त्याने शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान होणार नाही, याकडे सतत लक्ष द्यावे.
आपल्या व्यक्तिमत्त्वात आपण हळूहळू सकारात्मक बदल घडवून आणू शकता. सर्वप्रथम आपण जसे आहात तसेच स्वतःला स्वीकारा व स्वतःवर प्रेम करायला शिका कारण आपल्या भावनेतूनच आपण आनंदी किंवा दुःखी होऊ शकतो.
(जाहिरात)
e4 उद्योजक टीम!
-----------------------------------------
e4 service
e-learning and earning platform for all
WhatsApp Broadcasting Network
(e4 पोस्ट कॉर्नर +)™
इथे उद्योग, व्यवसाय, करीअर, व्यक्तिमत्व विकास, सक्सेस मंत्रा, वाचनीय पुस्तके, इंग्रजी, फ्रिलांसिंग जॉब्स इत्यादी विषयांवरील
अनेक लेख वाचायला मिळतात.
Follow Us On Facebook
Follow Us On Instagram
तुमचे प्रश्न, अडचणी, शंका विचारण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी आमच्या टीम मेंबरला व्हॉट्सॲप मेसेज किंवा कॉल करा
Customer Call Center Number
(24/7 Whatsapp And Calling Support)
Copy the Number And Call Now
+91-913-007-3071
e4 service, Maharashtra, India - 431114
E-mail : e4service4u@gmail.com
Copyright 2020 © e4 service (All Rights Are Reserved)
Comments
Post a Comment