यशस्वी कसे बनावे - भाग 2
विचार :-
मनामधून विचार उत्पन्न होतात. या विचारांची संख्या आकाशातील ग्रह-ताऱ्यांची पेक्षा जास्त आहे व त्यांची गती ही सूर्यकिरणांच्या गती पेक्षाही जास्त आहे. त्यामुळेच मनाला बहुतांश लोकांनी 'चंचल' असे म्हटले आहे. मनामध्ये सतत विचार येत असतात. हे विचार चक्र सुरूच असते. सारख्या विचारांची मग एक साखळी तयार होऊन मनात एक भावना निर्माण होते. ही भावना पुढे प्रबळ होत गेली की आपल्या हातून तशी कर्म होण्यास सुरुवात होते.
मन - विचार - भावना - कर्म
म्हणूनच आपणाला विचारांवर काम करायला हवे. भावनांवर काम करायला हवे. आपली विचारसरणी ओळखण्यास शिका. विचारात सकारात्मकता व शुद्धता आणण्यास शिका. विचारात फार मोठी शक्ती आहे. आपण जे इच्छितो ते मिळून देण्याची ताकद आपल्या विचारात आहे.
(जाहिरात)
एका विद्यार्थ्याला परीक्षेत 90 % मिळवायचे होते. त्याला नेहमी 70-75% गुण मिळत असत. त्याला सतत वाटत असे की आपण 90 टक्के गुण घेतले पाहिजे. त्यामुळे वर्गात आपल्याला मान मिळेल. घरी आई-बाबा आनंदी होतील. आपले नातेवाईक आपल्याकडे पूर्वीपेक्षा जास्त लक्ष देतील. प्रेम करतील. समाजात आपले व आपल्या कुटुंबाचे स्थान उंचावेल. 90 % गुण मिळवल्यावर काय काय होऊ शकते याचा विचार त्यांनी केला. मग 90% गुण मिळवण्यासाठी आपण काय करावयास हवे याचाही विचार आपोआपच सुरू झाला. त्याने तसे कामही सुरू केले. प्रत्येक वेळी आता पुढचे पाऊल कोणते यावर विचार करून तो पुढे-पुढे चालत गेला आणि तो दिवस उजाडला. त्याला 90% पेक्षा जास्त गुण मिळाले. त्याने आपले विचारचक्र सतत सकारात्मक ठेवले व एका वेळी एकच पाऊल उचलत गेला.
(जाहिरात)
आपणाला काय हवे याचा विचार करून त्यावर सतत सकारात्मक विचार करत राहिल्याने आपल्याकडून ठोस कर्म होण्यास सुरुवात होते. आपणास निश्चित असे काही थोडेफार वास्तविकतेमध्ये उतरण्यास सुरुवात होताच आत्मविश्वास वाढू लागतो व आपणाला पुढचे पाऊल उचलण्यास आणखी हुरूप येतो. या विचारशक्तीच्या जोरावर तुम्ही आपली उद्दिष्टे पूर्ण करू शकता.
e4 उद्योजक टीम!
-----------------------------------------
e4 service
e-learning and earning platform for all
WhatsApp Broadcasting Network
(e4 पोस्ट कॉर्नर +)™
इथे उद्योग, व्यवसाय, करीअर, व्यक्तिमत्व विकास, सक्सेस मंत्रा, वाचनीय पुस्तके, इंग्रजी, फ्रिलांसिंग जॉब्स इत्यादी विषयांवरील
अनेक लेख वाचायला मिळतात.
Follow Us On Facebook
Follow Us On Instagram
तुमचे प्रश्न, अडचणी, शंका विचारण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी आमच्या टीम मेंबरला व्हॉट्सॲप मेसेज किंवा कॉल करा
Customer Call Center Number
(24/7 Whatsapp And Calling Support)
Copy the Number And Call Now
+91-913-007-3071
e4 service, Maharashtra, India - 431114
E-mail : e4service4u@gmail.com
Copyright 2020 © e4 service (All Rights Are Reserved)
Comments
Post a Comment